रोगप्रतिकारक शक्तीसाठी डाळ भात खा.!
भारतातील जवळ जवळ प्रत्येक घराच्या स्वयंपाकघरात बहुतेक डाळ आणि भात बनवले जातात. रोजच्या जेवणात डाळ-भात सर्वात लोकप्रिय आहे. चवीच्या दृष्टीने डाळ भात रुचकर असतो, तर आरोग्यासाठी डाळ-भात याचा हेल्दी फूड मध्येही समाविष्ट करता येतो. तज्ज्ञांच्या मते डाळ-भात मुलांच्या वाढीसाठी फायदेशीर आहेत.
अशा परिस्थितीत मुलांना डाळ-भात खायला देण्याचा सल्ला दिला जातो. याशिवाय डाळ-भात खाण्याचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. डाळ-भात हा प्रौढांसोबतच लहान मुलांच्या आरोग्यासाठी चांगला मानला जातो. डाळ (वरण) मध्ये अनेक पोषक घटक आढळतात, जे शरीराला ऊर्जा देण्यासाठी तसेच रोगप्रतिकारक शक्तीसाठी उत्तम असते. ज्यांना वजन नियंत्रणात ठेवायचे आहे किंवा वजन कमी करायचे आहे, त्यांनीही डाळ-भाताचे सेवन करावे.
* डाळी मध्ये आढळणारे पोषक तत्व
हे आरोग्यासाठी एक खजिना आहेत. डाळी मध्ये फायबर, ब-जीवनसत्त्वे, मॅग्नेशियम, जस्त आणि पोटॅशियम भरपूर प्रमाणात असते. हे सर्व पोषक तत्व शरीरासाठी आवश्यक आहेत. डाळी मध्ये चरबीचे प्रमाण फारच कमी असते. खनिजे, जीवनसत्त्वे, अँटिऑक्सिडंट्स आणि फायबरने समृद्ध जे पचनास मदत करतात. डाळ पचायला खूप सोपे आहे. यासोबतच कडधान्ये खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरल्या सारखे वाटते. भूक न लागल्याने जास्त कॅलरीज घेण्याची चिंता नसते आणि वजन नियंत्रणात राहते.
* भातात आढळणारे पोषक तत्व
डाळी प्रमाणेच भातातही अनेक पोषक तत्वे आढळतात. त्यात सोडियम, पोटॅशियम, कार्बोहायड्रेट, प्रथिने, फायबर, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम आढळतात. भाताच्या सेवनाने शरीराला ऊर्जा मिळते. भातात हानिकारक चरबी किंवा कोलेस्ट्रॉल आणि सोडियम नसते. भात हा संतुलित आहार आहे. वजन कमी करण्यासाठी तुम्ही ब्राऊन राइसही खाऊ शकता.
* वजन कमी करण्यासाठी डाळ-भात खाणे
वजन कमी करण्याचा प्रयत्न करणारे लोक आहाराकडे विशेष लक्ष देतात. भात खाल्ल्याने वजन वाढते असा अनेकांचा समज आहे. पण डाळ-भात योग्य पद्धतीने आणि वेळेवर सेवन केल्यास वजन कमी होऊ शकते. डाळ-भात खाणे खूप आरोग्यदायी आहे. तज्ज्ञांच्या मते, रात्रीच्या जेवणात एक महिना डाळ-भात सामान्य प्रमाणात खाल्ले तर त्याचा परिणाम दिसू लागेल.
डाळ-भात खाताना लक्षात ठेवा की, डाळ जास्त प्रमाणात आणि भात कमी प्रमाणात खाणे आवश्यक आहे. डाळ-भातावर साजूक तूप घातल्याने तो संतुलित आहार बनतो. तुपात A, D, E, K ही जीवनसत्त्वे असतात, जी आरोग्यासाठी फायदेशीर असतात.
संकलन : मिलिंद पंडित, कल्याण
*सौजन्य : वेबदुनिया/प्रिया दिक्षित