एडीजीपी कृष्णप्रकाश आय पी एस व कारगीलहिरो दिगेंद्रकुमार यांच्या हस्ते “प्राईड ऑफ भारत” पुरस्कारांचे वितरण
* राष्ट्रीय कर्तव्यभावनेचा जागर करणाऱ्या कर्तव्यम महासंमेलनाचे पुणे येथे विशाल आयोजन संपन्न
* राजपत्रानुसार देशाचे नाव भारत झाल्यानंतर ” प्राईड ऑफ भारत ” या नावाने संस्थात्मक व स्वायत्त स्तरावर प्रथमच दिल्या दिल्या जाणारा देशातील सर्वोच्च पुरस्कार
आशा रणखांबे
पुणे (प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात वायुसेना दिनाचे औचित्य साधून कर्तव्यम सोशल फॉउंडेशन या संस्थेच्या वतीने आचार्य अत्रे रंगमंदि , पिंपरी येथे पंधरावे अखिल भारतीय स्तरावरील कर्तव्यम प्रेरणा महासंमेलन यशस्वीरित्या पार पडले. संस्थेचे अध्यक्ष संतोषभाऊ बारणे यांच्या अध्यक्षतेखाली व सचिव क्रांती कुमार महाजन यांच्या संकल्पनेतून या विशाल महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
याच पार्श्वभूमीवर जागतिक प्रतिभाशक्तीच्या एकत्रिकरणाचा महासंकल्प करून विश्वाशांती, राष्ट्रीय एकात्मता, आंतरराष्ट्रीय सौहार्द , व्यसनमुक्ती, योगा – निसर्गोपचार , महिला सक्षमीकरण या उदात्त उद्दिष्टांच्या संकल्पसिद्धिकरीता प्रेरणा व प्रोत्साहन देणाऱ्या या पंधराव्या अखिल भारतीय कर्तव्यम प्रेरणा महासंमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ” प्राईड ऑफ भारत “, ” भारत गौरव पुरस्कार”, व ” कर्तव्यम प्रेरणा पुरस्कार ” या पुरस्कारांनी भारतातील विविध प्रतिभावंताना गौरविण्यात आले.
अशाप्रकारे आयोजिलेल्या कर्तव्यम महासंमेलनाला संमेलनाध्यक्ष म्हणून समाजसेवक श्री. संतोषभाऊ बारणे तर स्वागताध्यक्ष म्हणून भारत सरकारच्या युवक कल्याण व क्रीडा मंत्रालयांतर्गत नेहरू युवा केंद्राचे संचालक दिपक निकम यांची उपस्थिती लाभली . याशिवाय महाराष्ट्र राज्याचे एडिशनल जनरल ऑफ पोलीस कृष्णप्रकाश IPS , भारत सरकारच्या जी – 20 सचिवालयाचे संचालक संजीव जैन, राजमाता जिजाऊ यांचे वडील लखुजीराजे जाधव यांच्या घराण्याचे वंशज महाराज शिवाजीराजे जाधव, तंजावर घराण्याचे वंशज महाराज विजयसिंहराजे जाधव , महावीरचक्र विजेता दिगेंद्र कुमार , वायुसेनेचे एअर मार्शल भूषण गोखले , एअर मार्शल प्रदीप बापट , एअर वाईस मार्शल नितीन वैद्य, सहकार अप्पर आयुक्त सुनिल पवार, कृष्णलीला वृत्तसंस्थेचे प्रमुख डॉ. कौशिक गायकवाड व सुप्रसिद्ध हृदय शल्य विशारद डॉ. यतीन वाघ यांची विशेष उपस्थिती लाभल .
भारतीय सेनेतील अमर जवान ज्योती ला अभिवादन करून व पुष्पचक्र अर्पण करून कर्तव्यम महासंमेलनाचा प्रारंभ झाला. याप्रसंगी भारतीय सेनेतील अमर बलिदानी शहीदांच्या परिवारातील वीरमाता व वीरपत्नी यांना सन्मानित करण्यात आले . याप्रसंगी संमेलनाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव व संयोजक क्रांती कुमार महाजन यांनी केले व प्रस्ताविकानंतर लगेचच उत्तराखंड राज्याचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमित सिंग यांच्या कार्यकाळाचे कॉफी टेबल बुक , कर्तव्यम स्मरणिका , क्रांती महाजन द्वारा लिखित निसर्गोपचाराचे सिद्धांत व आरोग्य , सुभाष सिक्रेट या पुस्तकांचे भव्य प्रकाशन करण्यात आले. तसेच याप्रसंगी भारतीय स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षाच्या अमृतमहोत्सवी पार्श्वभूमीवर भारत देशातील विविध राज्यांतून आलेल्या 75 प्रतिभावंताना पुरस्कृत करण्यात आले.
अत्यंत दिमाखदार व नेत्रदिपक पद्धतीने पार पडलेल्या या पंधरावे अखिल भारतीय कर्तव्यम प्रेरणा महासंमेलनाचे दैदिप्यमान आयोजन कर्तव्यम सोशल फॉउंडेशन या संस्थेच्या मुख्य संयोजनात श्री. शंभूराज्याभिषेक ट्रस्ट , रेड स्वस्तिक सोसायटी , अखिल भारतीय पूर्व सैनिक सेवा परिषद , मस्कटर्स ट्रैनिंग अकॅडेमी , एन.सी.आय.डी. , रेडियंट टॅलेंट बुक ऑफ रेकॉर्ड या संस्थांच्या संयुक्त एकत्रिकरणातून करण्यात आले . प्रेरणा व प्रोत्साहनाची अत्यंत उत्तम – उन्नत व उदात्त संकल्पना राबवून संपूर्ण देशातील हजारो लोकांच्या विश्वासावर आधारीत असलेल्या आजपर्यंतच्या पंधरा संमेलनांना यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल संकल्पक व संयोजक क्रांती कुमार महाजन तसेच संमेलनाध्यक्ष संतोषभाऊ बारणे यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
अशाप्रकारच्या संकल्पनांवर आधारीत सामाजिक एकत्रिकरणाची व ऐक्याची देशाला गरज असल्याचे महत्व ओळखून कर्तव्यम संस्थेच्या वतीने यापूर्वीदेखील महाराष्ट्र राज्याचे राजभवन येथे अशा स्वरूपाचे संमेलन यशस्वी केले असून याच धर्तीवर आधारीत पुढील संमेलनांचेदेखील विशाल आयोजन लवकरच देशाची राजधानी नवी दिल्ली व उत्तराखंड राज्याचे राजभवन येथे केल्या जाणार असल्याचे आयोजकांच्या वतीने कळविण्यात आले आहे.