स्मार्टफोन्समध्ये गेमिंग, व्हिडीओ रेकॉर्डिंग किंवा उन्हामुळंही स्मार्टफोन्स गरम व्हायला लागतात. त्यामुळं आपल्याला मोबाईलच्या अधिक गरम होण्याने त्रास सहन करावा लागतो. मग मोबाईलची गरम होण्याची कारणं आणि त्यासाठी आपण त्याची काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेऊया..
* सॉफ्टवेयर अपडेट्सचा प्रॉब्लेम, जास्त स्पेस शिल्लक नसल्याने, मोबाईलवर कोणतेही अॅप पूर्णपणे क्लोज नाही केले तर ते बॅकग्राउंडला मिनीमाईज होऊन चालू राहते आणि मोबाईल गरम होतो. साधारणत: स्मार्टफोन्समध्ये अनेक जुने आणि आऊटडेटेड अॅप्स असतील तर ते नेहमी अपडेट ठेवा.
* तुमच्या स्मार्टफोनची रॅम कमी असणे आणि इंटर्नल मेमरी कमी असली तर ती तुम्ही खूप फाईल्सने भरून ठेवतात. मग लोड आल्याने मोबाईल हँग होतो आणि गरमदेखील होतो. म्हणून अनावश्यक फाईल्स डिलीट करत जाव्यात.
* तुमच्या मोबाईलची रॅम कमी असताना तुम्ही जास्त मेमरी असलेले किंवा काही खास सपोर्ट नसलेले अनेक गेम्स खेळतात. यामुळे प्रोसेसरला हानी पोहोचते व मोबाईल हँग झाल्याने सततच्या लोडमुळे गरम होतो. म्हणून एक दोन सपोर्टेड गेम्स इंस्टॉल करत जाव्यात.
* स्मार्टफोन चार्जिंगला लावून ब्राइटनेस वाढवून गाणे अथवा व्हिडीओ पाहत वापर केल्यास, डेटा ऑन ठेवल्यास आणि कॉल लावल्यास असं सर्व एकाच वेळेस केल्यास मोबाईल अधिक वेगाने गरम होतो. त्यामुळे मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता असते. म्हणून फक्त काहीही न करता चार्जिंग होऊ द्या. शक्यतो मोबाईल चार्जिंग करताना कॉल आल्यास चार्जरचं बटन बंद करून कॉल उचलावा.
* साधारणतः बॅटरी-लो होणे म्हणजे तुमच्या फोनची चार्जिंग 15 ते 20% खाली येणे. अशा वेळेस आपण इंटरनेट वापरता, जास्त वेळ मोबाईलचा हॉटस्पॉट सुरू ठेवता तेव्हा मोबाईल गरम होतो आणि बॅटरी बॅकअप देखील कमी होतो. मोबाईल सतत चार्जिंग न करता एकदाच 90% पर्यंत चार्जिंग करावा, असं तज्ज्ञांचं मत आहे.
* अनेकदा आपण कोणत्याही चार्जरने मोबाईल चार्ज करतो. तसे केल्यास मोबाईल नक्कीच गरम होतो. मग बॅटरी बॅकअप कमी होतो. म्हणून आपल्याच मोबाईलचे चार्जर वापरावे.
* काही विशिष्ट घातक व्हायरसमुळंही मोबाईल गरम होतो किंवा मोबाईल हा उन्हाच्या संपर्कात आल्यामुळंही मोबाईल गरम होतो.
—–
- (साभार:आठवणीतील करजगाव समूह)