आपला बाप उभा आहे
भीमा तुला कळाया
उशीर फार झाला
बुद्ध आणि धम्माचा
नुसता लिलाव केला …..
जयभीम मुखात आमच्या
नुसताच गाजतो नारा
आंबेडकरी चळवळीचे
वाजले तीन तेरा …..
भीमा तुझ्या क्रांतीने
पेटली दुनिया सारी
दिलास जरी बुद्ध
देव सुटेना वारी ……
शिवत नव्हते आम्हा
तू शिलवंत केले
सोडून बा भीमा
गुणाचे भक्त झाले …..
सूर्याची सावली तू
ज्ञानाचा अथांग सागर
खातो रे आम्ही हल्ली
स्वाभिमानाची भाकर ……
अर्धी अधिक जिंदगी
कुत्र्याची जगतो आहे
कुणी दास रामाचा
बेईमान भिमास आहे …
भीमा तुझीच कमाई
अवघा देश खात आहे
मात्र सलामी इथे
कसायास देत आहे …..
चालतात तुझे अधिकार
बा भीमा तू चालत नाही
पुसली जात आहे
राजरोस संविधानाची शाई
झोपित देशवासी
माझा बाप जागतो आहे
कोर्टात सुप्रीमो
आपला बाप उभा आहे …..
-राजेंद्र क. भटकर
” राजगृह ” अलंकार पार्क, नवी वस्ती बडनेरा, अमरावती .