लिहत्या हातांनी
सुशिक्षित असून
आडाण्या सारख करू नये…!
तुमचं मत मांडाव
दुसऱ्या साठी
लेखणी मात्र गुलाम करू नये…!
चुकीच्या बाबीवर
लेखणीच्या चालवा तलवारी
इथं मात्र लेखणी म्यान करू नये…!
धारदार लेखणीतून
शब्दांचे बाण सोडा
कर्तव्य आहे आपलं ते मात्र सोडू नये…!
चांगलं असेल काम
तिथे मात्र शब्द सुमनांनी
रकाने लिहून कौतुक करण्या विसरू नये..!
अन्यायाला वाचा फोडा
लेखणीने तुमच्या झोडा
ज्या समाजात राहतो त्याला कधी विसरू नये
लिहत्या हातांनी
सुशिक्षित असून
आडाण्या सारख मात्र वागू नये
– अशोक पवार