बायको जाते माहेरी…

Please follow and like us:
Facebook
X (Twitter)
Pinterest
LinkedIn
Instagram

बायको जाते माहेरी…
….. घरी आणा………..
वरील गाळलेली जागा ज्याची त्याने भरायची आहे.. ज्या पध्दतीने तो ती जागा भरेल त्यानुसार त्याची वैयक्तिक जडणघडण ठरते.. कारण सगळ्यात महत्वाचे विचार..
हा विषय माझ्या मित्राने दिलाय ज्याची बायको कालच माहेरी गेली आहे.. दिवाळी संपली .. मुलांना सुट्ट्या त्यामुळे बऱ्याचशा सख्या माहेरी गेल्या आहेत आणि इकडे नवरोबाना स्वातंत्र्य मिळालं आहे.. प्रत्येकाचं स्वातंत्र्य उपभोगण्याची पध्दत वेगळी..

मी माहेरी फार कमी जाते त्यामुळे सचिन मला म्हणतो , अरे मी काय पाप केलं.. बायको माहेरी गेली घरी आणा पीतांबरी ही ॲड सगळ्याना माहीत आहे पण काहीना घरी कादंबरीही आणायची असते ( सोनल ची ).. म्हणजे चोरुन फॅंटसी वाचायच्या असतात.. कोणाला वाटेल निलांबरी आणावी .. choice is yours…. अहो , तो ओला टॉवेल बेडवर टाकु नका , कितीदा तुम्हाला सांगितलं.. तुम्ही ऐकतच नाही यातुन काहीना स्वातंत्र्य हवं असतं.. घरभर पसारा टाकुन मस्त तंगड्या पसरायच्या असतात..

कधी बसुयात रे ??.. चकणा म्हणून फराळ असतोच.. हे त्या बायकोलाही माहीत असतं बरं.. चार पाच मित्र गोळा करुन रात्रभर त्या मदिरेच्या सहवासात आपल्याला बायकांवर चर्चा किवा आनंद सेलीब्रेशन.. किती तो उत्साह ना.. तिलाही माहेरी जाउन मित्र मैत्रीणीना भेटुन मज्जा करायची असते.. आईच्या हातचं खायचं असतं.. सासरचं काहीबाही आईच्या कानात कुजबुजायचं असतं.. भावाकडुन गिफ्ट घ्यायची असतात.. तिलाही बदल हवा असतो.. रोज नवऱ्याचं मुलांचं करुन ती कंटाळलेली असते.. सासुचा जाच , नणंदेचे टोमणे नको रे बाबा.. दोघेही काय करतात हे दोघांनाही चांगलं माहीत असतं .. जे होइल ते ती परत आल्यावर पाहु म्हणत तो दारुवर मस्त ताव मारतो आणि स्वातंत्र्य सेलीब्रेट करतो.
काहीना त्याच्या मैत्रीणीला भेटायचं असतं.. जी माहेरी न जाता त्याची बायको माहेरी जाण्याची वाट पहाते .. कटु आहे पण सत्य आहे.. कारण तिलाही बदल हवा असतो.. त्यात आता भर पडलेय काउंसीलींगची.. काल मला मेसेज होता ,मॅम बायको माहेरी गेलेय.. आजच काउंसीलींग करायचय.. किती ती लपवाछपवी आणि किती तो अट्टाहास..
बायको घरी नसल्याचा आनंद त्याच्या मनात असलेल्या प्रश्नांची उत्तरे घेउन त्याला मिळवायचाय.. कोणी पिकनीक प्लॅन करतोय तर कोणी डिनर डेट.. अरे पण वेड्यानो , तिचीही कोणीतरी वाट पहात असेल हे तुम्ही विसरला का ??.. तिलाही हे स्वातंत्र्य वेगळ्या पध्दतीने अनुभवायचय हे लक्षात असुद्या..

नवरा बायकोला स्पेस हवी तशीच ती इतर नात्यानाही हवी असते.. हे दोघांनीही समजुन घ्यायलाच हवं.. ही सगळी आपल्या कर्मांची खिचडी आहे जी आपल्याला खायलाच लागते .. पण हे सगळं चटणी , लोणचं , कोशींबीरीसारखं चमचाभर असावं.. हे जर वाटीभर खाल्लं तर जळजळ होणारच.. गोड लाडु खाल्ल्यावर तिखट चकली खायला बरी वाटते तसच नात्यांचं आहे.. फराळात असणारे पदार्थ नात्यात पाहिले तर संसाराचं ताट उत्तम सजतं.. बैल दिवसभर कुठल्याही गोठ्यात जाऊन आला तरीही रात्री त्याला त्याच्या दावणीवरच यायचं असतं हेच संसारातलं गमक ज्याला उमगलं तो सुखी झाला.. स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नाही .. तो आहे फक्त आणि फक्त बदल..

कालच दिवाळीचं रील मी शेअर केलय.. त्याला कॅप्शन दिलय , “सगळ्याना सगळं मिळत नसतं .. आपल्याकडे जे आहे त्यात माणसाने समाधानी असावे..” माझ्या फेसबुक आणि इंस्टाला जरुर पहा.. एक सुंदर मेसेज द्यायचा मी आणि सचिन ने प्रयत्न केलाय.. नवरा बायको व्हीलन नाहीत तर उत्तम मित्र असायला हवेत.. बियॉन्ड सेक्स कादंबरी ज्यानी वाचलेय त्यांना यातील सीमारेषा लगेच लक्षात येइल..
तुमच्या मनातील भावना वरील गाळलेल्या जागी विचार करुन भरा.. कसही वागणं म्हणजे स्वातंत्र्य नसुन योग्य पध्दतीने आपल्याला मिळालेल्या वेळेचा सदुपयोग योग्य व्यक्तीसोबत करणं हेच शहाणपण असावं बहुधा.. शक्यतो व्यसनांपासुन दुर रहा.. वाचनाची चांगली सवय लावुन घ्या .. उत्तम ज्ञानाने आणि उत्तम विचाराने उत्तम स्वातंत्र्य उपभोगता येतं जे मी करते …

सोनल गोडबोले

Leave a comment