नगर (प्रतिनिधी): आमदार निलेशजी लकें म्हणजे तत्काळ सेवा देणारा लोकप्रतिनिधी म्हटलं तर अजिबात वावग ठरणार नाही. ते कधी ही फोन करा.स्वतः फोन वर उपलब्ध तर असतात परंतु समस्या सोडवण्यासाठी ते स्वतः शक्य झाल्यास जातीने हजर राहतात ह्याचा प्रत्यक्ष प्रत्यय पैठण मुंबई ह्या एस. टी. बस ने प्रवास करणाऱ्या प्रवाश्यांना शिरूर मध्ये आज रात्री आला आहे.
वेळ रात्री 1.45 वाजताची. ठिकाण शिरूर बस स्थानक. प्रवाशांनी खचाखच भरलेली पैठण आगाराची पैठण मुंबई बस शिरूर आगारा मध्ये येवून थांबली असता, सदर बसच्या चालकाची शिफ्ट संपून पुढील प्रवासासाठी दुसरा बदली चालक त्या ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे असताना असा कोणताही चालक तिथे उपलब्ध नव्हता. सदर बदली चालकाचा भ्रमणध्वनी देखील बंद येत असल्या कारणाने कोणत्याही प्रकारचा संपर्क त्यास होत नव्हता. त्यामुळे हि बस तब्बल दोन तास शिरूर आगारा मध्ये अडकून पडली होती. अशा परिस्थतीमध्ये शिरूर आगारा मधील भोंगळ कारभार देखील समोर आला.
आगारा मधील रात्र पाळीवर असणारा वाहतूक निरीक्षकच जागेवर नसल्याने प्रवाशी मात्र आता जाम वैतागून गेले होते… आणि अशा वेळी प्रवाशांमधील एकाने फोन लावला तो चक्क नगर पारनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लोकनेते निलेशजी लंके साहेबांना…. योगा योग पाहा साहेब देखील त्या वेळी मुंबईच्या दिशेने निघालेले होते.
सदर प्रवाशाचा फोन आल्यानंतर कसलाही मागचा पुढचा विचार न करता आमदार साहेब थेट बस डेपो मध्ये दाखल झाले आणि त्यांनी त्या ठिकाणी येवून परिस्थितीचे गांभीर्य ओळखून थेट पैठण आगाराच्या डेपो अधिकाऱ्याला फोन लावून सदर घटनेची कल्पना दिली व तात्काळ संबंधित यंत्रणेला त्यांच्या पद्धतीने फैलावर घेऊन पुढील सूचना करत बदली चालक उपलब्ध करून दिला आणि बस पुढील प्रवासा करीता रवाना झाली तेंव्हा कुठे प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. फोन केल्यानंतर आपल्यासाठी आमदार साहेब तात्काळ धावून आले आणि एखाद्या देवदुता प्रमाणे त्यांनी आपल्याला कोणतीही ओळख पाळख नसताना जी मदत केली ती पाहून आम्ही धन्य झालो हि त्या प्रवाशांची भावना खूप काही सांगून जाणारी होती.