दर्यापूर विधानसभा मतदारसंघात कोणाच पारड जड ?
अशोक पवार, गौरव प्रकाशन
अमरावती : विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील राखीव असलेला मतदारसंघ दर्यापूरमध्ये जोरदार विधानसभेचे पडघम वाजू लागले आहे. उमेदवार जरी अजून ठरले नसले तरी ही जवळ जवळ निश्चित झाल्यात जमा असून ह्या वेळी जोरदार तिरंगी लढत होणार हे जवळपास दिसत असल्याचं राजकीय विश्लेषक सांगत आहेत. विद्यमान खासदार बळवंत वानखेडे हे लोकसभेला नवणीत राणा यांना पराभूत करून खासदार झाल्यामुळे त्यांची जागा रिक्त होणार आहे, तिथून उमेदवार कोण असणार? हे आता स्पष्ट झालं असून रामेश्वर अभ्यंकर, हे काँग्रेस कडून तर भाजप कडून राणा तर सेने कडून अडसूळ असतील असा कयास बांधला जातोय.
रामेश्वर अभ्यंकर, बळवंत वानखेडे यांनी केलेली कामे व यशोमती ताई यांचा प्रभाव रामेश्वर अभ्यंकर,यांच्या पथ्यावर पडत असल्याचे दिसत आहे. त्यात रामेश्वर अभ्यंकर, हे स्थानीक असल्यामुळे त्यांचं पारडं जड असल्याचं दिसून येत आहे. शिवाय त्यांनी या पूर्वीही निवडणूक लढवली असून त्यांचे जुने कार्यकर्ते सक्रिय झाले आहेत. त्याच बरोबर त्यांनी शासकीय व निमशासकीय समित्यांवर काम केलं असल्यामुळे त्यांचा जनसंपर्क ही दांडगा आहे. गवई साहेबांचे स्वीय सहाय्यक म्हणून त्यांनी काम केलं असल्याने गवई यांचे जुने कार्यकर्ते त्यांचंच काम करणार अस दिसून येत आहे. त्या मुळे रामेश्वर अभ्यंकर, यांचं पारडं तूर्तास तरी जड असल्याचं दिसून येत आहे. त्यात लोकसभेला असणारी भाजप विरोधातील लाट अजून ही तशीच असल्याचं सोशल मीडियावर तरी दिसून येत आहे. त्यामुळे दर्यापूर मधून काँग्रेस पुन्हा आपली जागा राखणार अस दिसत असून रामेश्वर अभ्यंकर, हेच आमदार होतील अस खाजगीत ही दर्यापूर अंजनगाव सूर्जीमध्ये बोललं जातं आहे.