प्लास्टिकच्या बाटल्यांवर लाईन्स का असतात ?
शाळा, महाविद्यालय, कार्यालय अथवा कुठेही आणि कोणत्याही ठिकाणी आपल्याला प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीची गरज भासते. कधीकधी घरातून पाण्याची बाटली विसरल्यानंतर आपल्याला बाहेरून पाण्याची बाटली कधी ना कधीतरी घ्यावीच लागते. कोणत्याही कंपनीची पाण्याची मोठी बाटली बघितल्या नंतर आपल्याला त्यावर मध्यभागी काही आडव्या लाईन्स दिसतात.
पाण्याच्या बाटल्या सहसा प्लेन का नसतात? त्यावर लाईन्स अथवा कोणते ना कोणते तरी डिझाईन्स दिसून येतेच. पण मग असं का? वास्तविक आपण कोणतीही प्लेन वस्तू हातात पकडली की ती पटकन घसरून पडते. त्यामुळे प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटलीवर पकड मजबूत करण्यासाठी या लाईन्स असतात. आपल्या हाताची पकड या लाईन्समुळे बाटलीवर अगदी घट्ट होते आणि बाटली सरकून पडत नाही. अर्थात लाईन्सच असायला हवे असेही नाही. कोणतेही डिझाईन्स असले तरीही पकड मजूबत होण्यास मदत मिळते. पण अधिक बाटल्यांवर आपल्याला लाईन्स दिसून येतात हे देखील तितकेच खरे आहे.
ज्या प्लास्टिकच्या बाटलीचा आपण वापर करतो ते अत्यंत सॉफ्ट अर्थात मुलायम प्लास्टिक पासून बनलेले असते, जे लवचिक असते आणि दोन तीन वेळा वापरल्या नंतर ते खराब होते. त्यामुळे अशा बाटल्या अत्यंत तकलादू असतात आणि त्यावरील अशा लाईन्स बाटलीला थोडे मजबूत करण्यास फायदेशीर ठरतात. बाजारातील प्रत्येक वस्तू ही त्याच्या स्टाईल आणि त्याच्या पॅकिंगनुसार विकली जाते. मग ते कोणतेही उत्पादन असो.
त्यामुळे प्लास्टिकच्या बाटलीवर लाईन्स असण्याचे मुख्य कारण याची स्टाईल हे देखील आहे. या लाईन्स पाण्याच्या बाटलीला अधिक स्टायलिश दिसण्यास फायदेशीर ठरतात. आजकाल वेगवेगळ्या डिझाईन्स देखील दिसून येतात. पण तरीही लाईन्स असणाऱ्या प्लास्टिकच्या पाण्याच्या बाटल्या या अधिक प्रमाणात दिसून येतात हे नक्की..