भारतासारख्या कृषीप्रधान देशात शेतकऱ्यांची आत्महत्या का?
माझा बाप शेतकरी ,साऱ्या जगाचा पोशिंदा हे वाक्य म्हणजे फक्त कवितेचीच ओळ नाही, तर साऱ्या जगाच पोट भरणारा माझा बाप, एक समाजसेवेचच काम करतो ,असं म्हणायला हरकत नाही, कारण जिथे प्रत्येक गोष्टीचे भाव हे आभाळाला टेकले असले तरी, शेतामध्ये राब राब राबणारा आणि स्वतः उपाशी राहून पोटाला चिंधी बांधणारा माझा शेतकरी बाप हा जगासमोर फक्त एक प्रश्न म्हणून उभा राहिला आहे.
त्याचे प्रश्न सोडवण्याच दूरच! पण समाजामध्ये तोच एक प्रश्न बनून उभा राहिल्यामुळे समाजाची अधोगती होत आहे. समाजामध्ये असलेल त्याचा अस्तित्व दिवसेंदिवस नाहीस होत चालल आहे. एवढेच नाही तर अख्या जगाचा पोट भरणारा, तोच या कृषिप्रधान देशांमध्ये उपाशी राहतोय ही खरंच खूप दुर्दैवाची गोष्ट आहे. एकीकडे जग चंद्रावर चाललाय आणि भारत हा प्रगती करतोय. पण त्याच देशात शेतकऱ्याला , रात्रंदिवस का बर कष्ट करून सुद्धा एक वेळ उपाशी राहून स्वतःच्या इच्छा ,आकांक्षा मारण्याचा काम पडत आहे. काही महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे परदेशात गेल्यानंतर त्यांना ठळकपणे हा प्रश्न विचारण्यात आला की, तुमचा देश हा कृषिप्रधान देश आहे प्रगतशील राष्ट्र आहे तरीसुद्धा तुमच्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा प्रकरण हे खूप जास्त का आहे? खरंतर हा प्रश्न आपल्या भारतामध्येच विचारायला हवा विचार करण्याजोगा हा प्रश्न खरतर भारत हा कृषिप्रधान देश आहे, आपल्या भारतामध्ये अन्नाला अनन्यसाधारण महत्त्व आहे तेवढे इतर कुठल्याच देशात नाही अन्न म्हणजे परब्रम्ह आणि पिकवणारा मग कोण? तरीही तो लाचार ,गरीब आणि आत्महत्येला बळी पडणारा. पण या प्रश्नाला उत्तर जे मिळाले आहेत ते खरंच विचारात पाडणारे आहेत. शेतकऱ्याची आत्महत्या ही नापिकेमुळे होत नाही आणि त्याला मिळणाऱ्या त्या मोबदल्यामुळे होत नाही असे स्पष्टपणे सचिव प्रधानांनी सांगितले आहे. या आत्महत्येचे कारण म्हणजे घरातील वाद,व्यसनाधिनता, हुंडा, घरगुती भांडणे ही कारणे असल्याचे म्हटले आहे. हे कितपत योग्य आहे आणि कितपत खरे.
भारत देशाची प्रगती करायची असेल आणि तिला आर्थिक दृष्ट्या मजबूत करायचं असेल तर पहिले शेतकरी आणि शेतकऱ्याची कुटुंब सुरक्षित ठेवायला हवे. त्यांना लागणाऱ्या प्रत्येक गोष्टी या सरकारने पुरवल्या पाहिजे पण असं न होता सर्व जगाचा पोट भरणारा शेतकरी आज कर्जबाजारी होऊन आत्महत्येला बळी पडतो आणि कारणे असे दिले जातात तो कर्ज काढतो पण कशासाठी तर त्याच्या शेती पिकवण्यासाठी, तरीही त्याला मनासारखा मोबदला मिळत नाही आणि या सर्व गोष्टीचा परिणाम त्याच्यावर झाल्यानंतर तो आत्महत्या करतो हे तितकेच खरे असले तरी यावर पडदा टाकणारे असंख्य लोक या जगात आहे आणि या गोष्टीला कधी समोरच येऊ देत नाही. शेतकरी हा त्याच्या घराचा प्रमुख असतो पण शेतकऱ्याने केलेली आत्महत्या ही कधी जगासमोर येतच नाही कुठल्याही कारणाने तिला लपवून ठेवले जाते किंवा या व्यतिरिक्त इतर कारणे सांगितले जातात. शेतकरी हा देशाचा खरा आधार स्तंभ आहे जर शेतकऱ्याने शेतीच केली नाही तर या डिजिटल युगात तुम्ही कितीही प्रगती करा मात्र तुम्ही मागेच राहत कारण डिजिटल पद्धतीने तुम्ही अन्न पीकवू शकत नाही.
सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात पण अल्पभूधारक शेतकऱ्यांना त्याचा किती पत फायदा मिळतो हे प्रत्यक्ष सरकारनं पडताळून पाहिला हवं कारण अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या नावाखाली वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तिजोऱ्या भरतात हे वास्तव नाकारता येणार नाही. खरंतर शासकीय योजनांचा बाजार हा राजकारणी लोकांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत आहे. गावोगावी ग्रामपंचायत विभागातून शेती उपयोगी अनेक योजना सरकारकडून मंजूर होतात परंतु स्थानिक प्रशासन या योजनांचा प्रचार प्रसार करत नाही आणि ज्यांना या योजनांचा फायदा मिळायला हवा त्यांना तो मिळतही नाही. खरंतर प्रशासनामध्ये जबाबदार अधिकारी यांचे फार टंचाई आहे आणि त्याकडे सरकारने लक्ष घालायला हवे. जर याकडे लक्ष घातले नाही तर भ्रष्टाचारी अधिकारी वर्ग हा दिवसेंदिवस वाढत जाईल आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबणे ऐवजी त्या अधिक वाढतील कारण जो देशातल्या प्रत्येकाचं पोट भरण्यासाठी शेती पिकवतो त्याचाच पोट उपाशी राहून मरणाच्या दारात उभा राहील.
जगासमोर फक्त प्रश्न बनून उभा राहिलेला हा शेतकरी, समाजाच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर आहे आणि हे खरे सत्य टाळता येत नाही म्हणून सरकारने शेतकऱ्यांकडे जास्त लक्ष केंद्रित केले पाहिजे असं मला वाटते.
– प्रतिक्षा गजानन मांडवकर
(स्वप्न डोळ्यातले)
8308684865