लालकृष्ण अडवाणी यांना भारत रत्न का?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राम मंदिर आंदोलनाचे नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन सन्मानित करण्याची घोषणा केली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लालकृष्ण अडवाणी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर लिहिले की भारताच्या विकासात त्यांचे योगदान मोलाचे आहे.काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर भारतरत्न देऊन सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होता.भारतरत्न मिळवणाऱ्यांच्या यादीत लालकृष्ण अडवाणी ५० व्या क्रमांकावर आहेत . २०१४मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने अडवाणींसह एकूण सात जणांना भारतरत्न दिले असून त्यापैकी पाच जणांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.लालकृष्ण अडवाणी यांना भारतरत्न देण्याची मागणी भाजप समर्थक अनेक दिवसांपासून करत होते. लालकृष्ण अडवाणी यांना भारत रत्न देण्याची घोषणा होताच विरोधकांच्या भुवया उंचावल्या.२०२४च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा सन्मान देण्यात आला आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. अखेर १०वर्षे सत्तेत राहून आता हा निर्णय सरकारने का घेतला.?
भारत रत्न कोणाला दिला जातो?
भारतरत्नचा प्रवास हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान आहे. कोणत्याही जाती, धर्म, लिंग, व्यवसाय किंवा प्रदेशातील व्यक्तीला देशासाठी अमूल्य योगदान दिल्याबद्दल हा पुरस्कार दिला जाऊ शकतो. या सेवांमध्ये कला, साहित्य, विज्ञान, समाजसेवा आणि क्रीडा यांचा समावेश होतो.
भारतरत्न पुरस्कार २ जानेवारी १९५४ पासून सुरू झाला. पहिला सन्मान स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी, दुसरा राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन आणि तिसरा शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकट रमण यांना देण्यात आला.
आतापर्यंत विविध क्षेत्रातील ५० व्यक्तींना भारतरत्नने सन्मानित करण्यात आले आहे. हा सन्मान भारतीयेतरांनाही देण्यात आला आहे. मात्र, आतापर्यंत बहुसंख्य लोक हे राजकारणीच होते. लाल बहादूर शास्त्री यांना मरणोत्तर हा पुरस्कार देण्यात आला.
राजकारणाव्यतिरिक्त, राजकारणाव्यतिरिक्त इतर क्षेत्रात भारतरत्न मिळालेल्या काही व्यक्तिमत्त्वांचा समावेश आहे- शास्त्रज्ञ चंद्रशेखर व्यंकटरमण, समाजसेविका मदर तेरेसा, अर्थतज्ज्ञ अमर्त्य सेन, गायिका लता मंगेशकर, उस्ताद बिस्मिल्ला खान, क्रिकेटर सचिन तेंडुलकर, संगीतकार भूपेन हजारिका.
अडवाणी यांना भारत रत्न का ?त्यांचे उत्तरं अडवाणी यांनी केलेल्या देश सेवेत दडलेले आहे.लालकृष्ण अडवाणी यांचा जन्म पाकिस्तानात झाला.फाळणी नंतर ते भारतात येवून स्थायी झाले.भारतात आल्यानंतर त्यांनी अत्यंत निष्ठेने स्वतःला राजकारणात झोकून दिले. अडवाणी हे
भारतातील एक प्रतिष्ठित राजकीय नेते आहेत. भारताच्या विकासात त्यांचं योगदान मोठं आहे. तळागळातील देशसेवेपासून त्यांच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली. त्यानंतर त्यांनी आपल्या देशाचे उपपंतप्रधान म्हणूनही काम केलं. तसेच देशाचे गृहमंत्री आणि माहिती व प्रसारण मंत्री म्हणूनही काम पाहिलं.
जेव्हा लालकृष्ण आडवाणी यांचं नाव हवाला घोटाळ्यात समोर आलं तेव्हा त्यांनी ताबडतोब लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि जोपर्यंत त्यांच्यावरील सर्व आरोप पुसले जात नाहीत तोपर्यंत संसदीय राजकारण करणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं. आजघडीला भ्रष्टाचारात अडकलेले राजकारणी तुरुंगातून सरकार चालवण्याची भाषा करत आहेत.त्यासोबतच लालकृष्ण आडवाणी यांची युतीच्या राजकारणातील भूमिका लक्षात घ्यायला हवी, कारण आजघडीला राजकारणाची वाटचाल पुन्हा त्याच दिशेने सुरू आहे, असंही ते म्हणतात.
१९९६ मध्ये पाठिंब्याअभावी वाजपेयीजींचे सरकार १३ दिवसांत कोसळलं. तेव्हा आडवाणी म्हणाले होते की आपण सामाजिक अस्पृश्यता संपवण्याविषयी बोलतो, पण आपण राजकीय अस्पृश्यता पाळत आहोत. ही राजकीय अस्पृश्यता संपुष्टात आली पाहिजे.युतीच्या राजकारणात ‘राजकीय अस्पृश्यता’ हा परवलीचा शब्द आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला शत्रू किंवा अस्पृश्य मानणे योग्य नाही आणि हेच कारण आहे की त्यांनी ‘एनडीए’ आघाडीला चांगल्या प्रकारे चालवलं.
पाकिस्तानातील कराची इथं लालकृष्ण आडवाणी यांचा ८ नोव्हेंबर १९२७ रोजी जन्म झाला. भारत-पाकिस्तान फाळणीनंतर त्यांचं कुटुंब भारतात दाखल झालं. पण तत्पूर्वी त्यांचं प्राथमिक शिक्षण लाहोर इथं झालं. त्यानंतर मुंबईतील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमधून त्यांनी कायद्याची पदवी घेतली. लालकृष्ण आडवाणी यांच्याच काळात पहिल्यांदा भाजपचं सरकार स्थापन झालं.
पूर्वीचा भाजप अर्थात जनसंघाची सन १९५१ मध्ये स्थापना झाली. तेव्हापासून १९५७ पर्यंत त्यांनी जनसंघाचे सचिव म्हणून काम पाहिलं. त्यानंतर ते जनसंघाचे अध्यक्षही बनले. पुढे १९८० मध्ये भाजपची स्थापना झाल्यानंतर १९८६ पर्यंत ते पक्षाचे सरचिटणीसपदी होते. त्यानंतर १९८६ ते १९९१ पर्यंत त्यांनी अध्यक्षपदही सांभाळलं. दरम्यान, १९९० मध्ये भाजपनं लालकृष्ण आडवाणींच्या पुढाकारानं अयोध्येतील राम मंदिरासाठी आंदोलन सुरु केलं. यासाठी आडवाणींनी सोमनाथ ते अयोध्या रथयात्रा काढली. त्यांच्या या यात्रेला हिंदु समुदयाचा मोठा पाठिंबा मिळाला. या यात्रेदरम्यान त्यांच्यावर अटकेची कारवाई झाली पण त्यामुळं त्यांचं राजकीय वजन अजूनच वाढलं.लालकृष्ण आडवाणी तीन वेळा भाजपचे अध्यक्ष राहिले तर चार वेळा राज्यसभा खासदार आणि पाच वेळा लोकसभा खासदार राहिले. १९७७ ते १९७९ या काळात ते पहिल्यांदा केंद्र सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री बनले, यावेळी त्यांच्याकडं माहिती व प्रसारण मंत्रालयाचा कारभार होता. त्यानंतर १९९९ मध्ये अटल बिहारी वाजपेयींच्या पहिल्या सरकारमध्ये ते गृहमंत्री बनले तर २९ जून २००२ मधील दुसऱ्या वाजपेयी सरकारमध्ये उपपंतप्रधान बनले.
प्रा डॉ सुधीर अग्रवाल वर्धा
९५६१५९४३०६