विखे का चाललेत बॅकफूटवर.? लंके मात्र का येतायत फ्रंट फुटवर..!
गौरव प्रकाशन अहमदनगर (प्रतिनिधी) : लोकसभेच बिगुल वाजल आहे वातावरणात जरा पारा वाढतोय तस राजकीय वातावरण ही तप्त होताना दिसून येत आहे.
राजकिय कलगीतुरा जोरात सुरू झाल्याचं आता स्पष्ट जाणवत आहे. त्यातच आता डॉ.विखे यांनी अगोदर श्रीमंती व आता इंग्रजी भाषा ह्यावरून लंके यांना डिवचल खर परंतु ह्याच मुद्द्यावर जनतेतून प्रचंड रोष विखे यांच्या विरोधात दिसून येत आहे.
त्यातच लंके यांनी विखे यांच्यावर जो काही पलटवार केला आहे त्या मुळे विखे यांना त्यातून सावरन कठीण जात आहे. खर तर नगर दक्षिण हा ग्रामीण व नगर शहर असा मतदारसंघ असल्या मुळे ग्रामीण जनता जी बोली बोलते तीच लकें बोलत असल्या मुळे लकें समर्थकांनी हा मुद्दा जोरदार उचलून धरला असून खासदार हा काम करणारा हवा, नुसतं पोपटा सारखा बोलणारा नको! अस म्हणत सोशल मीडियावर विखे यांच्यावर्ती जोरदार प्रहार करत असल्याचं दिसून येत.
भाषा आणि बोली प्रत्येकाची अस्मिता असते. आणि तिच्यावर जर कोणी प्रहार करत असेल त्यावर घाव घालत असेल तर कुणी सहन करत नाही. हे समजून लकें आणि त्यांच्या समर्थकांनी हा मुद्दा लावून धरला असल्या मुळे विखे बॅकफूटवर गेल्या सारख वाटत आहे.