कुठे आहे लोकशाही?
Contents
hide
ती म्हणाली
कुठं आहे लोकशाही
मी म्हणालो
मेली
शाई तेव्हढी बाकी है
आहे …..
ती म्हणाली
संविधानाचा काय झालं
मी म्हणालो
व्हेंटिलेटर वर आहे
अखेरचा
श्वास घेत…
ती म्हणाली
आपल्या वस्तीच
काय झालं
मी म्हणालो
वस्ती तशीच आहे
जशी होती तसी
देशीच एक दुकान
होते
हल्ली दोन झाले ….
ती म्हणाली
शिक्षणाचं काय
मी म्हणालो
शिक्षण फार झालं
संस्कार मात्र
दूर गेलं ….
ती म्हणाली
विहाराच काय झालं
पूर्वीपेक्षा
विहार आधुनिक झाली
धम्म कार्य बाजूला
ठेऊन
कुलूपबंद केली …..
ती म्हणाली
आरक्षणाच काय झालं
मी म्हणालो आरक्षण
घेऊन आपण अंबानींच्या
बरोबरीत आलो
गवई साहेबांनी थोड
वर्गीकरण केलं …..
ती म्हणाली
आपल्या समाजाचं काय
मी म्हणालो
समाज हल्ली
झोपलेला आहे
माडी गाडी आणि
साडी उराशी
घेऊन …..
राजेंद्र क भटकर
बडनेरा