गाव कुठे हरवलं माझं?
गावात एक वटवृक्षाचे बुलंद झाड होते.त्याला चहूबाजूंनी समांतर करून घेणारा एक कट्टा होता.जणू तो म्हणजे गावकऱ्यांसाठी मैत्रीचा कट्टा होता.गावातील पांढऱ्या टोपीची व केसांची म्हातारी माणसे गावची शोभा होती.दिवसभर घडलेल्या घडामोडी ते चर्चा करत कट्ट्यावर बसायचे आणि आपली मते व अनुभवे मांडायचे.यांत शंकर आप्पा त्या सगळ्याचे प्रमुख होते . त्यांचा अनुभव भला मोठा होता. काय करावे ? काय करू नये? यावर त्यांचे बारकाईने निरीक्षण होते. त्यांची पत्नी प्रभावती बाई त्यांना प्रेमाने आम्ही सगळेच मोठी आई म्हणत असत. पोरी बायकांना उठता बसता अनुभवाचे ज्ञानामृत ज्ञानामृत देत असत. शेतकरी असल्यामुळे रानमेवा मात्र पोट भरून खायला मिळायचा. त्यात पेरू, बोर, मोसंबी, हरभरा, पालेभाज्या याचा समावेश असत.आप्पा दररोज येताना आपल्याबरोबर काही ना काही आपल्या सोबत घेऊन यायचे आणि तो रानमेवा आपल्या नातवंडांना आणि त्यासोबत खेळणाऱ्या लहान लेकरांना द्यायचे.तो रानमेवा खाऊन सगळे लेकरे आनंदाची ढेकर देत असत.
त्यांची मोठी आई याही स्वभावने नितळ व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्याही स्वयंपाक चवदार व उत्तम रित्या बनवायच्या. त्यांचे कष्ट मात्र आप्पा पेक्षाही जास्त असायचे पण; ते कधी दिसायचे नाही. चार वाजल्यापासूनच आपल्या दिवसाची सुरुवात करत असत लेकरांना व नातवंडांना आपल्या पतीला व शेतात काम करणाऱ्या गड्यांसाठी त्या खीर बनवायचे व सर्वांना पोटभर ढेकर येईपर्यंत खाऊ घालायच्या. त्यातल्या गड्यांनाही लेकराप्रमाणे माया करायचे त्या कामातही तसेच सुगरण होत्या त्यांनी लोटा घासला की घासला की आरशाप्रमाणे चमकायचा. झाडून काढली की मन प्रसन्न होईल इतके स्वच्छ काढायचे.
गावकरी दिवस भर काबाडकष्ट करून म्हैशीला घेऊन सूर्यास्ताच्या वेळी यायच्या तशी गावाला शोभा यायची. प्रत्येक शेतकरी आपल्या सोबत गाई म्हशींना वैरण घेऊन येत असत. इतरांनाही देत असत. रात्री समदीछ धारा काढायचेअन् दूध पिण्यासाठी जणू आमची शर्यतच लागायची. सर्वानी आपली ठरलेली गिलास घेऊन बसायचे. फेस आलेले दूध पिण्यास ची मज्जा वेगळीच होती . रात्री जेवताना रात्री मोठी आई स्वयंपाक करत असत व त्यांच्या सुना आम्हा सगळ्यांना जेवायला वाढत असत . अन्नाचा एक कणही वाया जाऊ देऊ नये. याकडे मोठी आई चे मात्र बारकाईने लक्ष होते. तरी समदी एकत्र येऊन वाड्यातच झोपत असू एकत्र करून गोष्टी सांगत. आपल्या उबदार पदराच्या छायेखाली जणू त्या मायेची उबदार शालच पांघर्याच्या.
बैलपोळा, दिवाळी ,गौरी ,गणपती, वटपौर्णिमा या सणांच्या दिवशी सगळी बायका मंडळी एकत्र यायच्या. वाड्यातील बाईका मोठी आई सोबत एकत्र येऊन फराळ, चपात्या, भाजी, एकत्र येऊन करायच्या आपल्या घरातील सगळ्याच मंडळींना एकत्र हाका मारून अंगत पंगत घालून जेवू वाढायच्या . गौरीच्या गाठी घेताना मोठी आई सगळ्यांना गौरीच्या कथा सांगा जणू त्या म्हणजे आमच्या आमच्या गावाचे एक प्रकारची संस्कारपीठ होते.
गावातली लाईट गेली की समदी गावकरी एकत्र येऊन वटवृक्षाच्या झाडाखाली बसून अनेक गोष्टीची नियोजन करत असत. म्हातारी माणसे त्यावर आपली अनुभवी सांगायची. तर कोणी तर कोणी झाशीच्या राणीची जिजामाता, शिवाजी महाराज यांच्या गोष्टी सांगायच्या जणू त्यांचा इतिहास आमच्या डोळ्यासमोर उभा आहे की काय असे वाटायचे.
आणखी गावात वणवा पेटला. गावकऱ्यांची तो शांत करण्यासाठी धडपड सुरू झाली. ही बातमी ही बातमी सर्व गावात जणू वाऱ्याप्रमाणे पसरली .काही तासानंतर पाण्याची सोय झाली. गावकरी एकजूट होऊन पाईप मोटर लावून वणवा शांत केला.शांततेला असं हे आमचं मुरूम गाव.
काय? सांगू बाई मोबाईलच्या दुनियेत गाव कुठे हरवलं?
– श्रुती सुनिता शिवाजी चौधरी
9011794469