मतदारांचा निरुत्साह कोणाच्या पथ्यावर ?
लोकसभा निवडणूक २०२४च्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी मतदान झाले. देशातील २१ राज्यातील १०२ मतदारसंघात मतदान प्रक्रिया पार पडली. पश्चि ट्टम बंगाल ते त्रिपुरा, मेघालय तर उत्तर प्रदेश-बिहार, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रासह तामिळनाडू आणि उत्तराखंडमध्ये मतदान पार पडले.पहिल्या टप्प्यात सर्वाधिक मतदान पश्चिम बंगालमध्ये नोंदवण्यात आले. येथे ७७.५७ इतके मतदान झाले. त्यानंतर त्रिपुरामध्ये ७६.१० टक्के तर पुद्दुचेरीत ७२.८४ टक्के इतके मतदान झाले. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच मतदारसंघात मतदान झाले. येथील मतांची टक्केवारी ५४.८५ इतके राहिली परत एकदा मतदारांनी महाराष्ट्रात निरुत्साह दाखविला.हा निरित्सह कोणाच्या पथ्यावर पडणार? मतदारांनी निवडणुकीकडे चक्क पाठ फिरविली. निवडणूक आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मोठ्या प्रमाणात जनजागृती केली. तरीदेखील मतदारांमध्ये म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नाही. लोकशाहीतील सर्वात मोलाचा शब्द म्हणजे मतदार. मतदानातूनच सरकारची निर्मिती व अभिव्यक्ती होत असते. म्हणून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अतोनात प्रयत्न केले जात असताना देखील मतदार घराबाहेर निघून मतदान करण्यास तयार नाही यावर कुठेतरी विचार मंथन होणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांमधील वाढता गोंधळ, आयाराम गयाराम प्रवृत्ती, वाढता भ्रष्टाचार, सरकार बद्दल नाराजी तरुणांमध्ये वार्ता संतोष शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा, अशस्वी कृषी निती तरुणांच्या हाताला काम नसणे, पायाभूत क्षेत्राकडे होत असलेले दुर्लक्ष, निष्ठावंत उमेदवारांना डावलने, भ्रष्टाचारी नेत्यांना राजकीय पक्षाचे तिकीट देणे, घराणेशाही अशा विविध कारणांमुळे मतदारांमध्ये निरक्षक आहे कोणताही पक्ष सत्तेवर आला तर काय फरक पडणार..? आज एका पक्षात तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या पक्षा विश्वास कोणत्या राजकीय पक्षावर व कोणत्या राजकीय पक्षाच्या उमेदवारावर करावा हा प्रश्न मतदारांच्या ठिकाणी निर्माण झालेला आहे. राजकीय पक्षांनी याचा कुठेतरी विचार करण्याची गरज आहे.
ज्या मतदारसंघात सत्तारूढ भाजपचा प्रभाव आहे, भाजपचे आमदार, खासदार आहे त्या मतदारसंघात देखील सरकारबद्दल नाराजी असल्याचे दिसून येते.या मतदारसंघांमध्ये मतदानाची टक्केवारी काय दर्शविते..?
राज्यात पहिल्या टप्प्यात होत असलेल्या निवडणुकीत सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी म्हणावी तशी समाधानकारक नव्हती. पाचही लोकसभा मतदारसंघांत सरासरी ५४.८५ टक्के मतदान झाल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाने दिली आहे. नागपूर येथे मतदानाची टक्केवारी घसरण्याची भीती व्यक्त केली जात होती.ती खरी ठरली. येथे भाजप उमेदवार नितीन गडकरी आणि काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे यांच्यात लढत आहे. नागपूर येथे एकूण २६ उमेदवार रिंगणात होते त्यामुळे काही उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. नागपूर लोकसभा मतदारसंघ टक्के तर नागपूर लोकसभा मतदारसंघात सायंकाळ ५ वाजेपर्यंत सरासरी एकूण ४७.९१ टक्के मतदान झाले. नागपूर लोकसभा मतदारसंघातील नागपूर मध्य ४४.६०टक्के ( आ. विकास कुंभारे , भाजप ), नागपूर पूर्व ५१.१७टक्के ( आ.कृष्णा खोपडे, भाजप) , नागपूर उत्तर ४३.४७टक्के ( आ. नितीन राऊत, काँग्रेस) , नागपूर दक्षिण ४७.९३ टक्के (आ. मोहन मते, भाजप) , नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघ ५१.००. टक्के (उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप), नागपूर पश्चिम ४९.०४ टक्के (आ. विकास ठाकरे, काँग्रेस) मतदान झाले आहे.रामटेक मतदारसंघात ५२..३८ टक्के मतदान झाले आहे. या ठिकाणी जात वैधता प्रमाणपत्राने उमेदवार बदलण्याची वेळ काँग्रेसवर आली होती. या मतदारसंघात शिवसेना उमेदवार राजू पारवे यांच्याशी थेट लढत श्यामकुमार बर्वे यांच्याशी आहे. रामटेक मतदारसंघात एकूण २० लाखांपेक्षा अधिक मतदार आहेत, तर एकूण २८ उमेदवार रिंगणात होते रामटेक लोकसभा मतदारसंघ मिळून १२४ संवेदनशील मतदान केंद्रे आहेत. रामटेक ५९.२६ टक्के (आ.आशिष जयस्वाल, अपक्ष), यात काटोल ५३.८५ टक्के (अनिल देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस), सावनेर५१.३८ टक्के (रिक्त), हिंगणा ४१.८० टक्के (आ.समीर मेघे, भाजप), उमरेड ६०.७४ टक्के (रिक्त), कामठी ५२.४८ टक्के (आ.टेकचंद सावरकर,भाजप) मतदान झाले आहे.
गडचिरोली – चिमुर लोकसभा मतदारसंघात एकूण १० उमेदवार रिंगणात होते प्रमुख लढत ही भाजप उमेदवार अशोक नेते व काँग्रेस उमेदवार डाॅ. नामदेव किरसान यांच्यात आहे. एकूण १६ लाखांपैकी किती मतदार मतदानाचा अधिकार वापरतात हे पाहण्यासारखे असेल. गडचिरोली चिमुर लोकसभा मतदारसंघातील आमगाव ६४ टक्के, आरमोरी ६५ टक्के, गडचिरोली ६५ टक्के, अहेरी ६३ टक्के, ब्रम्हपुरी ६७ टक्के आणि चिमूर ६४ टक्के मतदान झाले. सरासरी ६५ टक्के मतदान सायंकाळ ५ वाजेपर्यंत झाले.राज्यात गेल्या निवडणुकीत चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात फक्त काँग्रेस विजयी झाली होती. पण, सुरेश उपाख्य, बाळू धानोरकर यांच्या निधनानंतर काँग्रेसने त्यांच्या पत्नी प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली. त्यांची थेट लढत भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी आहे. जवळपास १८ लाख मतदार या मतदारसंघात आहेत, तर एकूण १५ उमेदवार या मतदारसंघात रिंगणात आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात चंद्रपूर ४८.२०. टक्के, राजुरा ५९ टक्के , बल्लारपूर ५९ टक्के , वरोरा ५८ टक्के, वणी 59 टक्के, आर्णी 50 टक्के मतदान विधानसभा क्षेत्रनिहाय झाले आहे.भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात भाजपचे सुनील मेंढे यांची थेट लढत डाॅ. प्रशांत पडोळे यांच्यासोबत आहे. या मतदारसंघात एकूण १८ लाख मतदार आहे. तर एकूण १८ उमेदवार रिंगणात आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघात तुमसर ५९ टक्के , भंडारा ५७ टक्के, साकोली ५९ टक्के, अर्जुनी मोरगाव ५४ टक्के, तिरोडा ५७ टक्के, गोंदिया ५६ टक्के मतदान विधानसभा क्षेत्रनिहाय झाले आहे.
पहिल्या टप्प्यात देशात सर्वात कमी मतदान बिहारमध्ये झाले. बिहारमधील मतदानाची टक्केवारी फक्त ४६.३२ टक्के इतकी आहे. पहिल्या टप्प्यात तामिळनाडूमधील सर्व ३९ तर उत्तराखंडमधील सर्व ५ मतदारसंघात मतदान पार पडले.
-प्रा डॉ सुधीर अग्रवाल
वर्धा
९५६१५९४३०६