गावं पीपयाचा पार
Contents
hide
झालं झुंजूमुंजू झालं
नाही मृदूंगाची धून
हरपली हरपली
चिपळ्यांची किणकीण !!
भर दुपारी दुपारी
सूर्य आला माथ्यावर
झाला भकास भकास
गावं पीपयाचा पार !!
पिढ्या मागे पिढ्या गेल्या
देतो सावली गारवा
उभा उदास उदास
गच्च पिपय हिरवा !
नाही छायेत बसलं
कोणी वृद्ध पोरं सोरं
सारं सुनं सुनं वाटे
नाही कुणी गुरं ढोर !!
पाखरांची किलबिल
नाही कावळा बगळा
ओस पडले घरटे
आन पाखरांची शाळा !!
सांजावल्या तिन्ही सांजा
नाही गोधूळ चरण
दिसें वांझोट वांझोट
गावठाण गायरान !!
जात धर्म द्वेषापाई
झाला बंद गावंगाळा
अवखळ गावांवर
कशी आली अवकळा !!
वासुदेव महादेवराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक(सेनि)
अकोला 9923488556.