भांबोरा येथे ग्राम जयंती महोत्सव विविध कार्यक्रम ; मान्यवरांचा सत्कार
नितीन पवार Amravati News कुऱ्हा : नजीकच्या भांबोरा येथील हवदूलाल महाराज मंदिरात वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची जयंती अर्थात ग्राम जयंती महोत्सवाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यानिमित्त सकाळी ग्रामसफाई, रामधून, पालखी शोभायात्रा,भजन, कीर्तन यासह विविध कार्यक्रम संपन्न झालेत. गावतील गुरुपौर्णिमा कार्यक्रमासाठी अविरत कार्यरत श्री रामभाऊ राघोबाजी खंडार, गुरुदेव सेवा भजन मंडळाचा पाया रचणारे श्री रामचंद्र परमात्मा केने आणि हीच परंपरा पुढे नेणारे श्री मोरेश्वर चिंधुजी कालमेंघ आणि शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात महत्वपूर्ण योगदान देणारे प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे यांचा मान्यवरांच्या हस्ते भावपूर्ण सत्कार करण्यात आला. तसेच वर्षभर सामुदायिक प्रार्थना व विविध कार्यक्रमातील सहभागाबद्दल कु.स्वरा प्रफुल पोलाड, कु. खुशी गजानन मोरे, पारश्री अमोल भुंबर, एकता स्वप्निल वाघ यांचा प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. श्री मोरेश्वर काळमेघ व श्री प्रदीप गोरे यांचे सामुदायिक प्रार्थनेवर भाषण झाले.
ह.भ.प. श्री मोरेश्वर कालमेघ यांचे काल्याचे कीर्तन आणि महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.हा महोत्सव यशस्वीतेकरिता बबनराव पोल्हाड, मनोज खंडार, बाळासाहेब गोरे,रुपेश कालमेघ, किशोर कालमेघ, प्रथमेश भुंबर, प्रदीप गोरे,अमोल भुंबर, किशोर भुंबर, श्रीकांत गोरे, रामा वानखडे, सुरेश अण्णा खंडार, प्रवीण पोलाड, सुदाम उतखेडे, मनोज गावंडे यांच्यासह गावकऱ्यांनी अथक परिश्रम घेतले. (Latest News)