बळीचा बळी.!
सुर्याच्या भोवताल उजेडाची आशा धरून जगनारे आपलं अख्ख आयुष्य अंधारात जगत असतील आणि उजेडाची अहोरात्र चोरी करनारे अंधकार, गरीबीला प्रकाशाची फक्त न फक्त आशा दाखवून त्यांच्या जीवनात फक्त अंधार पेरत असतील तर एक दिवसाचा उधार मिळनारा तो प्रकाश काय कामाचा ? त्या पेक्षा त्या झोपडीतले कवडसे बरे जे कोणतीही अपेक्षा कोणताही स्वार्थ न ठेवता प्रत्येक दिवशी निस्वार्थ भावनेने डोकावतात आणि दैदीप्यमान करतात इथल्या प्रत्येक घराला…
आता तुम्ही म्हणाल हे काय ? काही नाही अहोरात्र मेहनत करून जर मेहनतीच्या xxxxखाली अंधाराच राज्य असेल तर तुम्ही ठरविले हमी भाव, आमच्या घामाचा मोबदला हमी भावापेक्षा कमी भावाने खरेदी का करतात… इथला मजूर इथला कामगार इथले वेठबिगार आपले संपुर्ण आयुष्य फक्त आणि फक्त उजेडाची वाट पाहत मुठभर धनाढ्य समाजाच्या पखाली वाहनारा हेला बनून मसनात जातो, परंतू कधी त्याच्या काड्या गौर्या मसनात जातात व अखेर त्याच्या आशा अकांक्षाची राख रांगोळी होते कळतच नाही.
लुटनारे रोज त्याच्या नसांनसात सळसनार्या रक्ताच्या प्रत्येक धमन्यातले रक्त नकळत गेचुडा सारखे पितात हे त्यालाही कळत नाही. आणि त्याला हेही कळत नाही की एका दिवसाच्या या दिवाळी नावाच्या गोंडस उत्सवासाठी बारा महीने त्याच्या शरीरातला दैदीप्यमान अग्नि स्वतःचे महल चंदेरी करन्यासाठी कसा जाळून घेतात. इथला समाज समतेची दिवाळी कधी मनवनार नाही इथे समानतेचा प्रकाश कधी लखलखनार नाही.इथे सतत बली चा बळीच घेतल्या जाईल हे मात्र त्रिकाला बाधित सत्य आहे.
विजय ढाले
#बिब्बा