अनमोल मतदान
लाख मोलाचं रे मतं
नको वाया जावू देवू
ऊठ बाबा घाई करं
मतदानाला रे जावू !!
जनाचं नाही मनाचं
मतं पक्क कर भिडू
आगीतून निघूनिया
नको फुफाट्यात पडू !!
सदा आपण सत्याचे
सारे गुणगाणं गाऊ
ऊठ बाबा घाई करं
मतदानाला रे जावू !!
गोट्या पेक्षा ईट बरी
असते रे मऊ मऊ
रक्तात मिळते रक्त
कामात पडते भाऊ !!
मतासाठी पैसा धेला
तुरे लाचं नको खावू
ऊठ बाबा घाई करं
मतदानाला रे जावू !!
मतदान सुट्टीत नको
ईकडे तिकडे फिरू
देशाशी अन स्वतःशी
बेईमानी नको करू !!
माय माती संगे सदा
ईमान कायम ठेवू
ऊठ बाबा घाई करं
मतदानाला रे जावू !!
विचार नकोस करू
देश काय देते तुले ?
ईच्यार तुह्या मनाले
काय देल्ल तू देशाले ?
देश अन लोकशाही
सारं सुरक्षित ठेवू
ऊठ बाबा घाई करं
मतदानाला रे जावू !!
– वासुदेव महादेराव खोपडे
सहा. पोलीस उपनिरीक्षक(सेनि)
अकोला 9923488556.