विदर्भस्तरीय पत्रकारांची एकविसीय कार्यशाळा
शिवदर्शन आध्यात्मिक म्युझियम धामणगावगढी येथे_
*मीडिया अध्यात्म व सामाजिक परिवर्तन विषयावर
विदर्भस्तरीय पत्रकारांची एकविसीय कार्यशाळा
* ब्र कु. डॉ. शांतनू भाई आणि ब्र.कु. डॉ. सोमनाथ वडनेरे यांचे प्रमुख मागदर्शन.
परतवाडा : अचलपूर तालुक्यातील चिखलदरा मार्गावरील शिवदर्शन आध्यात्मिक म्युझियम धामणगाव गढी येथे रविवार 25 फेब्रुवारी रोजी विदर्भस्तरीय पत्रकारांची कार्यशाळा सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.
* सामाजिक परिवर्तनासाठी आध्यात्मिकता :
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून माध्यमांकडे पाहिले जाते. पत्रकारांना, माध्यमांना आपल्या प्रकाशन, प्रसारण व प्रक्षेपणात आध्यात्मिकतेद्वारे कसे सामाजिक परिवर्तन करता येईल ? यावर मंथन करण्यासाठी विदर्भातील माध्यम प्रतिनिधींकरीता विशेष या कार्यशाळेचे आयोजन केले आहे. प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालय परतवाडा, राजयोग शिक्षण आणि शोध प्रतिष्ठान, मीडिया प्रभाग माऊंट आबू, राज्य मराठी पत्रकार परिषद, जिल्हा मराठी पत्रकार संघ, अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
* मान्यवरांची उपस्थिती :
कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शन ब्रह्माकुमार डॉ. शांतनूभाई, राष्ट्रीय समन्वयक, मीडिया प्रभाग, माऊंट आबू, ब्र.कु. प्रा. डॉ. सोमनाथ वडनेरे, महाराष्ट्र मीडिया विंग प्रमुख, जळगाव खान्देश हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. कार्यशाळेचे प्रमुख पाहुणे खा. नवनीत राणा, आ. बच्चु कडू, आ. राजकुमार पटेल, ज्ञानेश्वर उपाख्य, दादासाहेब राऊत आहेत. शंकरबाबा पापळकर, ब्र.कु. लतादीदी, ज्येष्ठ पत्रकार राजेश राजोरे, खामगाव, ब्र.कु. दिलीप बोरसे, नाशिक, ब्र.कु. अविनाशभाई यांचा जीवनगौरव व नवरत्न दर्पण पुरस्कार देऊन सत्कार केला जाणार आहे.
* शिवदर्शन आध्यात्मिक म्युझिमयच्या थ्रीडी हॉलचे उद्घाटन
मूल्यनिष्ठ समाजनिर्मितीसाठी ब्रह्माकुमारीज् यांनी विविध आध्यात्त्मिक रहस्य स्पष्ट करण्यासाठी तसेच मानव जीवन दिव्यीकरणासाठी शिवदर्शन आध्यात्मिक म्युझिमयची प्रेरक निर्मिती केली आहे. यातील थ्रीडी हॉलचे उद्घाटन ही कार्यशाळेतील मान्यवरांच्या शुभहस्ते आयोजित करण्यात आलेले आहे. वरील सर्व कार्यक्रमांना विदर्भातील सर्व माध्यम प्रतिनिधींनी उपस्थित रहावे असे आवाहन ब्र.कु. लतादीदी, ब्र.कु. अविनाशभाई यांनी केले आहे.