भांबोरा येथे वृक्ष लागवड मोहीम
गौरव प्रकाशन
तिवसा (प्रतिनिधी) : भांबोरा ता. तिवसा येथील गुरुदेव सेवा मंडळ,इतर स्वयंसेवी संस्था,भांबोरा ग्रामवासी आणि श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपलखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथक यांचे वतीने भांबोरा येथे भव्य वृक्ष लागवड मोहीम राबविण्यात आली.या मोहिमे अंतर्गत स्मशानभूमी परिसरात १७५ वृक्ष आणि श्री हनुमान मंदिर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर,हवदूलाल महाराज मंदिर, बुद्ध विहार या परिसरात २५ वृक्ष त्यात कडुनिंब १००, वड १०, पिंपळ १०,चिंच १५, कवट १५, इतर ५० असे एकूण २०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
तद्नंतर श्री.मोरेश्वर कालमेघ यांचे अध्यक्षतेखाली प्रबोधन सभा झाली.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ.नरेश इंगळे,प्रा.प्रशांत टांगले,भारत बुटले यांनी मार्गदर्शन केले.यावेळी वृक्ष संगोपनासाठी गावकऱ्यांनी ट्री गार्ड देण्याचे व झाड जगविण्याचा संकल्प केला.या मोहिमेत गुरुदेव सेवा मंडळ, इतर स्वयंसेवी संस्था,गावकरी सोबतच श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.
सूत्रसंचालन प्रदीप गोरे यांनी तर बबन पोलाड यांनी आभार मानलेत ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मोरेश्वर काळमेघ, प्रदीप गोरे, बबन पोलाड, बाळासाहेब गोरे,किशोर कालमेघ, प्रमोद पोलाड,प्रदीप पोलाड, मनोज खंडार,अनिल कालमेघ, प्रशांत काळमेघ,पवन खंडार कु.साक्षी बा.पोलाड,प्रफुल्ल बा.पोलाड,गिरीश उतखेडे, अनिकेत उतखेडे,अजय गोरे, सार्थक गोरे,रुपेश कालमेघ, किशोर भुम्बर,विलास हूड, अविनाश मुळे,केतन पोलाड,प्रणय मोरे प्रशांत खंडार, निशांत कालमेघ,यश भुंबर,गजानन कालमेघ, प्रवीण पोलाड, मंगेश पोलाड, विनोद पोलाड,भारत बुटले,परी प्रशांत कालमेघ,चेतन/केतन कालमेघ, कु. स्वरा प्र.पोलाड,सुजल स. पोलाड,महेंद्र धुर्वे,मिलिंद भुंबर राहुल घोम,अविनाश घोम,रुपेश पोलाड,स्वप्निल वाघ,स्वराज वाघ आदींनी परिश्रम घेतले आहे.