संभाजीनगरमध्ये अभ्यास करणाऱ्या दत्ताची दुःखद घटना
4-5 वर्षापासून एकदम प्रामाणिक अभ्यास करणारा मुलगा.. MPSC च्या आजपर्यंत बऱ्याच मुख्य परीक्षा दिल्या..
घरची परिस्थिती एकदम बेताची… आई वडील शेतकरी.. तरीपण संघर्ष करत अभ्यास परिस्थितीशी दोन हात करून अभ्यास चालू होता…
2020 psi mains la 5 दीवस असताना दत्ताच्या सख्या भावाला दिल्लीत upsc mains ची तयारी करतांना pneumonia झाला, तो अंगावर काढला आणि भाउ वारला..
तरीपण दत्ता ने मुख्य परीक्षा देउन थोडया मार्क्स ने रिझल्ट गेला.. तरीपण न खचता अभ्यास चालु ठेवला..
आत्ता तलाठी चा निकाल आला गावात सत्कार झाला सगळ झालं पण भ्रष्ट system मुळे 8 दिवसांनी तलाठी ची दुसरी लिस्ट लागली आणि त्यात दत्ताच नाव गेले, परंतु ते पण दुःख विसरून क्लर्क टायपिंग पास झाला आता त्याचा रिझल्ट पण येणारं पण दत्ताच नाही राहिला तो रिझल्ट बघायला (कदाचित लवकर रिझल्ट लागला असता तर तो ह्या मानसिक तणावातून वाचला पण असता)
हया सगळ्यांमध्ये दत्ता ने सगळ्या गोष्टींचा त्रास करुन घेतला पण कुणाकडे व्यक्त नाही झाला.. जीवाला त्रास करून घेतला.. आणि तो आजारी पडला.. तब्ब्येतिकडे दुर्लक्ष करून ताणतणावात राहिला आणि दत्ता जीवाला मुकला… एवढं बर नसताना पण अंगावर काढल आणि काल पर्यंत लायब्ररीत च होता .. त्याला लायब्ररी तच heart attack आला .
सांगायचं एकच की MPSC सगळ काही नाही आहे … स्पर्धा परीक्षा ने एकाच घरातील दोन भावांचा जीव घेतला.. कुणाचे काही नाही गेले पण त्या माऊलीचे 2 पोटाचे गोळे गेले
आज काय वेळ आली त्यांच्यावर आपण विचार पण नाही करू शकत..काय स्वप्न असतील त्यांचे…
म्हणुन मित्रांनो व्यक्त व्हा.. त्रास नाही करून घायचा.. आपण आहोत तर सगळ आहे …
आपल्या मागचे आई बाप शेवटपर्यंत आपल दुःख सोबत घेऊन जातात .. MPSC सगळ नाही .. तब्ब्येतीची काळजी घ्या..
#mpscexam
#mpscaspirants
#MPSC2024
#मराठीमाती
#RIP