पारनेर मध्ये ही मराठा आंदोलन पेटलं ; गटेवाडीचे उपसरपंच सुनीलशेठ पवार यांचा
गौरव प्रकाशन
पारनेर (प्रतिनिधी): जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पहिल्या पासून ग्रामीण भागातून जी जोरदार साथ होती ती आणखी मजबूत होत जरी असली तरी सरकार दरबारी अजून काही हालचाली नसल्यामुळे खालावत चाललेली जरांगे यांची प्रकृती पाहून सकल मराठा समाजात सरकार विरोधात आणि मराठा समाजाच्या नेत्यांच्या विरोधात जोरदार प्रदर्शन सुरू झाली आहेत. अनेक ठिकाणी गावबंदी आहे.
त्यातच आता ग्रामपंचायत पातळीवर ही राजीनामे यायला सुरुवात झाली असून. आदर्श गाव राळेगणसिद्धी शेजारी असणारे गटेवाडी गावचे उपसरपंच सुनील शेठ पवार यांनी आपल्या पदाचा राजीनामा जाहीर केला आहे. आपण समाजाच्या भावना समजू शकतो. त्यांच्या मागण्या रास्त असून उपसरपंच च काय मी मंत्री जरी असतो तरी राजीनामा दिला असता. ज्या समाजा मूळे आपली ओळख आहे.त्या समाजाच्या लढाई साठी ,मी राजीनामा देत असून “,माझ्या साठी समाज प्रथम” असल्याचं त्यांनी म्हंटल आहे.
एकंदरीत पारनेर मध्ये ही आंदोलनाची धार जोरदार होत असून, अजून राजीनामे येतील असा अंदाज आहे. अस जर जर झालं तर, हे नक्कीच प्रशासना साठी मोठी डोकेदुखी तर ठरणार आहेच. परंतु सकल मराठा समाज येणाऱ्या आगामी निवडणुकी साठी वेगळी रणनीती आखत असल्याचं ही समोर येत आहे.