मधुमेही आणि किडनी स्टोन असलेल्यांसाठी हे फुल आहे रामबाण औषध.!
आयुर्वेदात अशा अनेक औषधी वनस्पती आहेत ज्या विविध आजारांवर फायदेशीर आहे, त्यापैकीच एक पळस. पळस औषधी गुणधर्म असलेली एक झाड आहे आणि त्याचे सर्व भाग अनेक रोग आणि विकारांवर उपचार करण्यासाठी वापरले जातात. लाल फुलांमुळे पळसाला ‘फॉरेस्ट फायर’ म्हणतात. आयुर्वेदात पळस एक शक्तिवर्धक म्हणून वापरला जातो.
myupchar.com के डॉ लक्ष्मीदत्त शुक्ला सांगतात की पळसामध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-बॅक्टेरिअल, वेदनाशामक आणि अँटी-ट्युमर गुणधर्म आहेत. यामुळे मधुमेह नियंत्रित राहतो, शिवाय लघवीचं प्रमाण वाढतं. त्याच्या पानांमध्ये तुरट आणि अँटी-ओव्हुलेटरी गुणधर्म असतात. त्याची फुलंसुद्धा अनेक गुणांनी समृद्ध आहेत.
डोळ्यातील मोतीबिंदूचा उपचार
मोतीबिंदू आणि रातांधळेपणा यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पळस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी पळसाच्या मुळांचा रस घ्या आणि डोळ्यांमध्ये घाला. असं केल्याने डोळ्याच्या इतर समस्यांपासूनही मुक्तता मिळेल.
किडनी स्टोन दूर करतं
डोळ्यातील मोतीबिंदूचा उपचार
मोतीबिंदू आणि रातांधळेपणा यासारख्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी पळस उपयुक्त ठरू शकतो. यासाठी पळसाच्या मुळांचा रस घ्या आणि डोळ्यांमध्ये घाला. असं केल्याने डोळ्याच्या इतर समस्यांपासूनही मुक्तता मिळेल.
किडनी स्टोन दूर करतं
साखर घालून पळसाच्या फुलांचं सूप बनवा. हे सूप दोनदा पिण्यामुळे मूत्रातील जळजळ दूर होईल आणि मूत्रपिंडातील स्टोनसुद्धा वितळतील. साखर न घालताही तुम्ही हे सूप बनवू शकता, ज्यामुळे यकृतासंबंधी समस्याही दूर होतील.
सूज नाहीशी होते
पळस मुरगळ, जळजळ किंवा इतर कोणत्याही कारणामुळे होणारी सूज दूर करते. एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. पाण्याला उकळी आल्यानंतर त्यावर जाळी ठेवून या जाळीवर पळसाची फुलं ठेवा. ही फुलं तुम्हाला जिथं सूज आली आहे, त्या भागावर लावा. दिवसातून दोनदा ही क्रिया करा.
त्वचेसाठी फायदेशीर
त्वचेशी संबंधित आजारांवर उपचार करण्यासाठीदेखील पळस प्रभावी आहे. यासाठी पळसाची साल कोरडी किसून घ्या. एक चमचा पळसाच्या सालीची पावडर घेऊन त्यात तूप आणि मध मिसळून दिवसातून दोनदा प्या. अँटी-एजिंग म्हणून हा एक चांगला उपाय आहे.
पोट फुगण्याच्या समस्या दूर होते
पळसाची फुलं पचन संबंधित समस्यांसाठी उपयुक्त आहे. तुमचं पोट फुगल्यासारखं वाटत असेल तर पळसाची सालं घ्या आणि कोरड्या आल्यासकट पाण्यात उकळवा. हा काढा गाळून प्या.
रक्तस्राव बंद होतो
www.myupchar.com चे डॉ.अभिषेक गुप्ता यांनी सांगितलं की, नाकातून रक्त येणं हे नाकाच्या रक्तवाहिन्यांमधून रक्तस्त्राव होण्यामुळे होतं. याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे कोरडं नाक किंवा नाकात दुखापत. पळसाची फुलं नाकाच्या रक्तस्त्रावात देखील उपयुक्त आहे. 5-7 पळसाची फुलं घ्या आणि रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. हे पाणी गाळून त्यात साखर मिसळून प्या. याने नाकाचा रक्तस्त्राव थांबतो.
शरीरातील विषारी घटक दूर होतात
पळसाच्या फुलांची पावडर तयार करा आणि दररोज 1-2 ग्रॅम पावडर पाण्यासह घ्या. चवीला कडू लागलं तरी यामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर जाण्यास मदत होईल.!