आभाळात काळे काळे ढग जमा झाले होते. बायजा वावरातील काम आटवून लगबगीने घराकडे निघाली होती. सोबतच्या बायांना मागे टाकून झपाझप फावले टाकत चालत होती. मनात आपल्या लहान मुलांच्या आठवणीने ती बेचैन होत होती.
आसमंत वायटूळच्या धुळाने भरून गेला होता.डोळ्यात मातीचे बारीक बारीक कण जात होते. बायजा डोळे चोळीत आपला रस्ता पार करीत होती. संध्याकाळचा रविकर ढगांच्या थव्याने झाकून गेला होता. शिशिरागमाच्या ऋतूमधील पाने उंच उंच झोका घेत होते. रस्त्याने भेटणाऱ्या ओळखीच्या बायांसोबत बायजा बोलत नव्हती. तीची सारी नजर तिच्या मुलावर होती. कधी धावत तर कधी झपाझप पावले टाकत ती घरला जवळ करत होती.
आईच्या अतृप्त मनाला मूल दिसतात संजीवनी मिळाली होती. शेजारच्या रकमाबाईनं तिच्या मुलाला सांभाळलं होतं .वातावरणातील मेघगर्जनेनं मुल रडत होतं. आईला पाहून त्याचं रडणं थांबलं होतं .त्याला उचलून कड्यावर घेतलं व रखमाचे आभार मानले.
मायेचा ओलावा त्याला मिळाला होता. दिवसभराच्या विराने त्याचे डोळे पानावले होते .बायाच्या घरातअठरा विश्व दारिद्र होतं. तरुणपणातच दारूच्या नशेत तिच्या पतीचे निधन झालं होतं. वाईट व्यसनाने तिच्या जीवनाचं वाटोळं केलं होतं. पण तिने हार मानली नव्हती .आपल्या छोट्या यशवंतला घेऊन ती मोठ्या एक हिमतीने राहत होती. आई-वडिलांचा आसरा केव्हाच निघून गेला होता. सासरच्या लोकांनी तिला नेहमी बोल लावले होते .परंतु ती ते सहन करत आपलं जीवन फुलवत होती .
अशा गरीब व दुःखमय वातावरणात यशवंत मोठा होत होता. घराजवळची रखमा त्याला सांभाळत होती. प्रेमाने पाहत होती .रखमाच्या अनुभवाचा व तिच्या विचारांचा उपयोग बायजाला होत होता. यशवंत याला शिक्षणासाठी शाळेमध्ये टाकलं होतं. शिक्षणाचे महत्त्व कसे असते. शिक्षणामुळे माणूस कसा यशस्वी होऊ शकतो याची जाणीव तिने आपल्या मुलाला करून दिली होती. डॉ.बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतीराव फुले यांच्या शिक्षणाची ओळख तिने त्याला करून दिली होती .
गरिबीत राहिलं तरी चालेल पण आपण चोरी करायची नाही. वाईट मार्गाने पैसा कमवायचा नाही. खोटे बोलायचे नाही. हे सर्व संस्कार तिने यशवंतला दिले होते. इयत्ता सातवीची परीक्षा प्रथम क्रमांकाने पास झाल्यावर तो शहरात आठव्या वर्गात शिकायला गेला. शहरातील शासकीय वस्तीगृहात राहून तो अभ्यास करू लागला .पोटाला चिमटा देऊन तो अभ्यास करू लागला. मित्र पैशावर चैन करत होते. पण तो आपले पैसे शिक्षणासाठी लावू लागला. आईचे दुःख त्यालाच स्वस्थ बसू देत नव्हते..! शिक्षण घेऊन आपण आपले दारिद्र्य नष्ट करू शकतो असा चंग त्यांनी बांधला होता. तो प्रथम क्रमांकाने पास झाला होता. बाराव्या वर्गातसुद्धा त्याने चांगले मार्क घेतले होते. पुढचे शिक्षण घेण्यासाठी तो नागपूरला आला होता. नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.त्यांनी आपली सारी शक्ती लावली होती. डॉक्टर होऊन आपण समाजाची सेवा करायची असा चंग आपल्या मनात बांधला होता. पाहता पाहता डॉक्टरचे शिक्षण पूर्ण झाले होते .तो चांगल्या मार्काने पास झाला. गावात आला त्याचे नाव चमकू लागले .गरीब पण हुशार यशवंत गावाचे भूषण ठरला होता. गावातील पहिलाच मुलगा डॉक्टर झाल्याने गावात त्यांचा व आईचा सत्कार केला गेला.
आई म्हणाली ,यशवंत आता तू नोकरीचे बघ..!
यशवंत म्हणाला,
आई, मी सरकारी नोकरी करणार नाही ..
मला जनतेची सेवा करायची आहे. एका छोट्या गावात त्यांनी दवाखाना टाकला .तो प्रेमाने व सहानुभूतीने औषध समजून द्यायचा. नव्या विचारांची ओळख तो करून देत होता. शिक्षणाचे महत्त्व ,संविधानाचे महत्त्व , आपले अधिकार व कर्तव्य याची माहिती गावकऱ्यांना देत होता. नवनव्या विचारांची पेरणी तो गावात करत होता .आपल्या देशाला प्रगतीपथावर जायचे असेल तर आपण आपल्या गावापासून सुरुवात करायला हवी .
गावातील सर्व वाईट चालीरिती त्यांनी बंद केल्या होत्या. दारू पिणे, कीर्तन करणे, बाबाचे भारुड ,देविदेवीचे कार्यक्रम यानी आपण पुढे न जाता मागे येत असतो. जर आपल्या गावाला पुढे जायचं असेल तर सर्व रुढीजन्य रीतीरिवाज बंद करून नव्या विचारांची नवे स्वप्न आपण पाहिले पाहिजेत. या विचाराने गावातील सर्व तरुणांना त्यांनी एक केले .
गावातील बुजुर्ग आणि अनुभवी लोक यांच्यासोबत त्याने सलोख्याचे संबंध ठेवले . नव्या विचारातून एक नवा गाव निर्माण करण्याचे स्वप्न त्यांच्या डोक्यात होतं .डॉक्टरच्या नेतृत्वाखाली गावकऱ्यांनी नवा आदर्श निर्माण केला होता .आईच्या कष्टाला फार मोठे फळ आले होते . गावातील माणूस हा खरा शिल्पकार ठरला होता .मानवतेच्या नव्या विचारांची मशाल गावात प्रकाशमान झाली होती .डॉ. बाबासाहेब आंबेडकर ,महात्मा जोतिराव फुले,संत गाडगेबाबा यांचे आदर्श घेतलेले हे गाव माणूस निर्माण करण्याची फुलबाग झाली होती. बायजाच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळत होते.डॉ यशवंत यांच्या कार्यकर्तृत्वाने गावाला नवे वैभव प्राप्त झाले होते. नवा माणूस निर्माण करणारी कार्यशाळा या गावात निर्माण झाली होती .आकाशातील सूर्य दिमाखात प्रकाशकिरण तेजाळत होता .भारताचा तिरंगा शाळेच्या आवारात मोठ्या डौलाने फडकत होता. भारतीय गणराज्य दिनाचे देशात नव्या माणसाची निर्मिती केली होती….
संदीप गायकवाड
नागपूर
९६३७३५७४००