साहित्य दर्पण कला मंच नागपूर आयोजित प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न…
अमरावती (प्रतिनिधी) : दिनांक ११ फेब्रुवारी २०२४ रोजी नागपूर येथे साहित्य दर्पण कला मंच नागपूर आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण व राज्यस्तरीय कविसंमेलनाचे आयोजन केले आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून संगीता भाऊसाहेब जामगे परभणी ,सह उद्घाटक अशोकजी टेंभूर्णीकर नागपूर कैलासजी धोंडणे, ब्रम्हपूरी ,अध्यक्ष डॉ.विनोद जाधव मुंबई, उपाध्यक्ष नरेंद्र अनंत पवार ,मुंबई स्वागताध्यक्ष तथा समूह संस्थापिका कल्पना अशोक टेंभूर्णीकर नागपूर,
प्रमुख अतिथी म्हणून डॉ.सानिया खान नागपूर, रविंद्रजी जनवार, सचिव गोंडवन विकास संस्था नागभीड जिल्हा चंद्रपूर , समूह संथापक प्रा.नानाजी रामटेके आरमोरी जिल्हा गडचिरोली ,डाॅ. बाबासाहेब आंबेडकर कला साहित्यिक विचारमंच महाराष्ट्र, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले साहित्यिक विचारमंच छत्रपती संभाजी नगर, रमाई साहित्यिक विचारमंच , नागपूर , प्रा.भिमराव गायकवाड , विलास गजभिये , संध्या राजूरकर , जगदीश राऊत , प्रा. लक्ष्मण शहारे, शालिक जिल्हेकर , मनोहर गजभिये , माणिक खोब्रागडे ,हंसराज शहारे , संजय सायरे, प्रकाश दुलेवाला , संजीव भांबोरे कवी संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.डॉ.सुनंदा जुलमे आदी उपस्थित होते.यात कार्यक्रमाचे कार्यभार सांभाळणारे अशोक पांडुरंगजी टेंभूर्णीकर यांनी आपल्या आई वडिलांच्या नावानी सन्मानचिन्ह कवी सदस्यांना वितरणाची व्यवस्था केली होती.
यात सामाजिक ,शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली त्यांना विविध सन्मानाने सन्मानित केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरीता माला मेश्राम, अर्चना चव्हाण ,प्रितीबाला बोरकर , सुभाष मानवटकर, डॉ. मधुकर दिवेकर , रंजना शहारे , पुष्पा नानाजी रामटेके यांनी मोलाचे सहकार्य केले.सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि पाहुण्यांचा परिचय प्रा.नानाजी रामटेके यांनी बाप काव्यसंग्रहाची प्रस्तावना आणि समीक्षण समूह संस्थापिका कल्पना टेंभूर्णीकर,यांनी केली. समूह मार्गदर्शक हरिश्चंद्र धिवार यांचे मनोगत कार्याध्यक्ष लोपामुद्रा शहारे यांनी वाचून दाखविला. कार्यक्रमाचे संचालन छाया जांभूळे यांनी केले तर आभारप्रदर्शन माला मेश्राम यांनी केले.अतिशय सुंदर कार्यक्रम संपन्न झाला.