पानोली मधील शेतकरी आंदोलन बरच काही बोलून जातंय….!
काही दिवसापूर्वी जी पारनेर तालुक्यात गारपीट झाली त्यात सर्वात जास्त बाधित गाव कोणतं असेल तर ते होत पानोली. नुकसान किती झाली ? कशी झाली? पंचनामे झाले? मंत्री आले आणि गेले कित्येक पुढारी आले आणि गेले.आता तर हिवाळी अधिवेशन ही सुरू झाले. त्या मुळे शासन ,आणि प्रशासन ह्या भागाला जी तात्काळ मदत करण्याची वलग्ना करत होते त्या वलग्ना हवेत विरल्यात जमा आहे. निर्यात बंदी करून जो थोडा फार कांदा ह्या गावातील शेतकरी वर्गाकडे गारपिटीतुन वाचून शिल्लक होता तिथे ही भाव पाडून आणखी अडचणी वाढवल्या.
अनेक प्रश्न आहेत जे इथल्या आणि आजू जूबाजूच्या पंचक्रोशीतील शेतकरी वर्गाला सतावत आहेत. झालेला खर्च ,वसूल कसा करायचा ते तर शक्य नाही. काढलेल कर्ज ,फेडायच कस कारण हाती पीक नाही.दुधाला ही भाव कमी झालेत. शेतमालाला ही भाव उतरलेत मग इथल्या शेतकरी वर्गाने नेमकं जगायचं कस ?
व्यवस्था कुठली ही असो ती तारणारी हवी ! परंतु आज हे शासन ,आणि प्रशासन दोन्ही ही कुचकामी ठरत असून ही व्यवस्था शेतकरी वर्गाला मारणारी ठरत असेल तर आम्ही नेमकं स्वातंत्र्य मिळवून मिळवलं काय? माझ्या काळ्या मातीत घाम गाळणाऱ्या शेतकरी वर्गाचा तळतळाट जर हे सरकार घेत असेल तर इथून पुढे आंदोलन अजून मोठी करावी लागतील त्याची व्याप्ती वाढवावी लागेल.
सुरुवात पानोली ,जवळा येथून झालीय. ही अन्यायकारक जुलमी राजवटीविरोधात पेटलेली मशाल . कधी वणव्यात रूपांतरित होईल आणि त्याची धग ” राजकीय नेतृत्वाविरोधात इतकी मोठी असेल की तिची व्याप्ती समजणार ही नाही. कुठल्याही सहनशीलतेला अंत असतो ,त्या नंतर जो होतो तो असतो उद्रेक”, उद्रेक होऊ नये अस सरकार ला जर वाटत असेल तर त्यांनी ह्या आंदोलनाची तत्काळ दखल घेऊन मदत पोहचवावी. गारपीटग्रस्त शेतकऱ्यांनसोबत… तुम्ही……? प्रतिक्रिया द्या व्यक्त व्हा
अशोक पवार
8369117148