शेतकरी बोलतोय..!
माय बाप सरकार…! आन समद पक्ष तुमचं इकडून तिकड आन तिकडून इकडं झालं असल. तर म्या काय बोलतोय त्याच्याकडं बी लक्ष द्या..! नाय आता ईचारधारासत्व ” आन तत्व तुम्ही समदी धुळीला मिळावली तर हाय म्हणा! पण थोडी फार लाज शिल्लक असलं तर आम्ही काय म्हणतोय त्यावढं एकूण घ्या ! ही इंनती! त्या बिगर आम्ही करू बी काय शकतो म्हणा! पण २०२४ ध्यानात असू द्या …! नाय म्हणलं सत्तेच्या धुंदी मंदी इस्राल निवडणूका ह्या पाच वर्षानि येत अस्त्यात आन त्या येळी शेतकरी कोणाला चुना आन कोणाला बैल लावायचा त्यो आता पासून इचार करतोय बर का…?
बर त्य जाऊ द्या आर वाढला थोडा कांद्याला भाव तर लगीच कँच्या तरी नियमाँ खाली भाव पाडून शेतकरी गाडायची योजना आणली आन फडणवीस आन धनु भावूआम्हांसनी अक्कल शिकवत्याती” आर तुम्ही समदी पार दादा ,असू द्या नाय तर शिंदे असू द्या ! त्या दिल्ली वाल्या मोर्ह हुजरा करणारी . काय दबदबा व्हता र दिल्लीत महाराष्ट्र राज्याचा. जिथं पाकिस्तान मधल्या अटकेव ” मराठी झेंडा मानाने फडकवला तिथं तुम्ही अटक व्हॅईल म्हूण थेट जी हुजूर..म्हणता.
बर सोडा मुद्द्यावर येतोय , तुम्ही शेतकरी हिताचे असाल, तर निर्यात बंदी उठवा नाय तर तुम्हाला २०२४ मधी आमदार कीच्या खुर्चीतूंन, मंत्रीपदाच्या जबाबदारी तूंन आम्ही मुक्त करणार म्हंजी करणार बर का ह्यो मुद्दा नोट करून ठेवायला सांगा तुमच्या पाळीव पत्रकारांना आन ,हुजऱ्याना! आन आजून तुम्हाला सत्ता सोडून काही दिसत असल तर राज्यात अनेक भागात पाऊस नाय! दुष्काळ हाय ! जनावर, त्यांच्या साठी चारा, गोरगरीब जनता तिच्या साठी रोजगार हमीची काम सुरू करा लवकरात लवकर ! नाय तर २०२४ ध्यानात ठेवा .. नांगर ….आणि बैल……
– अशोक पवार