शेवट गोड व्हावा…
सान्तावर भादरनार्यायन या कलेला किती जगवल ?
खरतर अशाच बाजार बुनग्यांनीच ही कला बंद पाडली आणि अखेर संस्कृतीचा नाश केला करत आहेत. वर्षाच्या शेवटी सान्ता ही भेटतो आणि हा भारतीय कलेचा अदभुत कलाविष्कार ही आज भेटला आणि वर्षा अखेरचा दिवस ही गोड झाला.
यांना आम्ही जगवायला पाहिजे होतं भरभरून द्यायला पाहिजे होतं…पन दिल नाही. हे इतिहासातली पाने आहे. ही नष्ट करण्यात धन्यता मानणारे नाकाने संस्कृती टिकविण्याच्या बाता झाडतात. ज्या काळात घड्याळाची काटे न्हवती त्या काळात घड्याळाच्या काट्याची कामे ही जीवंत माणसे अत्यंत चोख करायची, सकाळी चार पासून गावं जागवायची, जेने करून गावाचा प्रपंच गाडा व्यवस्थित चालावा.
छत्रपतींच्या शिवरायांच्या काळात ह्या जीवंत कला डबरूवाले, पांगूळ, डोंबारी, वासुदेव या आणि अशा अनंत कला अत्यंत प्रभावीपने जोपासल्यागेल्या, पोसल्यागेल्या त्या छत्रपती शाहुंच्या काळापासून तर लगभग सत्तर अंशीच्या दशकापर्यंत…
आज ती शेवटचा श्वास घेत आहे.तोच शेवटच्या श्वास आज दारी आला आणि नवचैतन्य देऊन गेला त्याच्या चरणाशी दोन सुखदुःखाच्या बाता झाल्या…खरच या देशात अंतीम ध्येयापर्यंत जर कलेच्या अविष्काराचा विकास केला असता तर यांची प्रत्येक पिढी या समाजाला ‘राम प्रहरी’ जागृत करण्याचे काम करत राहिली असती.
विजय ढाले