फटाका दुकानाची उपायुक्तांनी केली पाहणी
गौरव प्रकाशन अमरावती (प्रतिनिधी) :अमरावती महानगरपालिका क्षेत्रात मा.उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार फटाका विक्री व साठवणीसाठी काही दिशा निर्देश देऊन विस्पोटक अधिनियम व नियमानुसार मापदंड ठरवून दिले आहे. त्यानुसार मा. उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार जे फटाका विक्रेता स्पोटक अधिनियम व नियमातील साठवणूक व विक्रीबाबत तरतुदीने पालन करणार नाही यांचे विरुध्द महानगरपालिका, गृह विभाग यांनी कठोर कारवाई करावी असे निर्देश आहे.
त्या अनुषंगाने अमरावती महानगरपालिका क्षेत्रात कायमस्वरुपी फटाका विक्रीसाठी व साठवणूकीसाठी देण्यात आलेल्या जवळपास १९० दुकानापैकी काही दुकानांची, साठवणूक केंद्रांची दिनांक ०९/११/२०२३ रोजी महानगरपालिका उपायुक्त जुम्मा प्यारेवाले यांनी आपले अधिनस्त पथकासोबत निरीक्षण केले त्यामध्ये अंकीश फटाका भंडार मसानगंज, सम्राट फटाका नागपुरी गेट, जय बालाजी फटाका नागपुरी गेट, जय लक्ष्मी फटाका नागपुरी गेट, गायत्री फटाका राठी नगर, गाडगेनगर फटाकामार्केट, महेंद्र कॉलनी, रेवसकर फटाका व सायंस्कोर फटाका मार्केट ची पाहणी केली असता मा.उच्च न्यायालयाचे निर्देशांचे व विस्पोटक नियम व अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन झाले असल्याचे निदर्शनात आले, यामध्ये रहिवासी इमारतीमध्ये तळमजल्यावर फटाका विक्री व साठवण करता येत नसतांना काही ठिकाणी अशा पध्दतीने साठवणूक व विक्री करतांना आढळले.