आसवांनी खुशीत भिजली पाखरं…
बाबा तुझ्या कुशीत निजली पाखरं..
ना ऊन, ना वारा, ना पावसाची भिती,
बघताच तुला फुलली ५६ इंच छाती,
पुस्तकं घेऊन उशीत निजली पाखरं….
बाबा तुझ्या कुशीत निजली पाखरं..
तेजापुढे तुझ्या चंद्र तारे फिके पडावे,
जीवनात एकदा बा तुझे दर्शन घडावे,
आनंदाचे अश्रू पुशीत निजली पाखरं..
बाबा तुझ्या कुशीत निजली पाखरं..
निळ्या भगव्यांनी फुलले दिक्षाभुमी शहर,
नागनगरीला आला नागवंशी यांचा बहर,
“बघ कशी तुझ्या एसीत निजली पाखरं…
बाबा तुझ्या कुशीत निजली पाखरं..
जाता जाता फक्त विचार घेऊन जाईल,
अडाणी असलो तरी तुला लेकरात पाहिल,
परिवर्तन वादळात ना विझली पाखरं..
बाबा तुझ्या कुशीत निजली पाखरं !!!