नागपूर (प्रतिनिधी) : स्थानिक राष्ट्रीय विद्यालय, भिवापूर येथे दिनांक 8 मे ते 12 मे 2023पर्यंत शालेय विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमाची मेजवानी व धमाल मस्ती मोफत उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
शिबिराचे उद्घाटन शिष्फा फाईन आर्ट कॉलेज नागपूरचे चित्रकार, प्रख्यात उर्दू शायर प्रा.बाबर शरीफ यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्ष विद्यालयाचे प्राचार्य इमरान शेख,अतिथी संस्थेच्या सचिव लातिफा कुरेशी( शेख मॅडम) सहसचिव शहला शेख,वरिष्ठ शिक्षक गजानन मुरकुटे,किशोर राऊत, पर्यवेक्षक फारुख शेख इत्यादी उपस्थित होते.मार्गदर्शन म्हणून प्रा.बाबर शरीफ यांनी विद्यार्थ्यांना क्रिएटिव्ह पेंटिंग चे प्रात्यक्षिक करून दाखवून कलाकृती लाखो रुपयाला विकली जाते व व कलेचे महत्त्व विद्यार्थ्यांना पटवून दिले.
प्राचार्य इमरान शेख यांनी विद्यार्थ्यांनी या शिबिराच्या माध्यमातून सर्वांगीण विकास करून घ्यावा, शिबिरात सुप्तगुनाचा विकास करून भविष्यात मोठे कलावंत व्हावे, आपलं नाव उज्ज्वल करावे असे अध्यक्षीय भाषणात आपले मनोगत व्यक्त केलेआणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या शिबिरात आपला सहभाग नोंदवावाअसे आवाहन केले. उमरेड येथील कोरिओग्राफर रोशन सोनेकर,तन्वी जाधव,प्राची गजभिये, मंजिरी पेंदाम यांनी विद्यार्थ्यांना नृत्य कलेचे धडे देऊन मुलांना मनसोक्त नाचविले. आपल्या विद्यालयातील विद्यार्थी नृत्य कलेमध्ये खूप अग्रेसर आहेत विद्यार्थ्यांना नृत्य कला शिकवताना मला सुद्धा खूप आनंद होत आहे असे शिबिरात कोरिओग्राफर रोशन सोनेकर यांनी सांगितले.
अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष सुरेश झुरमुरे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावर मार्गदर्शन करून बुवाबाजी, भूत, प्रेत हे सगळेच थोतांड असून यापासून आपण कोसोदूर राहावे असे सांगितले मांत्रिक आपल्याला कशा पद्धतीने फसवतात हे प्रात्यक्षिक करून दाखवले. मांत्रिक लोक कशा पद्धतीने आपल्याला जाळ्यात अडकवतात हे प्रात्यक्षिक करून दाखवले. विद्यार्थ्यांना अंधश्रद्धा वैज्ञानिक दृष्टिकोन याची परिपूर्ण माहिती दिल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य इमरान शेख यांनी सुरेश झुरमुरे यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
योगगुरू सुरेश पंचभाई यांनी योगा करून विद्यार्थ्यांना सुदृढ कसं राहता येईल यांचे महत्व पटवून दिले. तणाव मुक्त राहण्यासाठी योगाचे किती महत्त्व आहे हे सुद्धा सांगितले. विद्यालयातील कलाशिक्षक सुरेश राठोड यांनी सुंदर हस्ताक्षर कसे गिरवावे यांचे प्रात्यक्षिक करून सुंदर अक्षर कसे काढावे व अक्षराचे महत्त्व हे पटवून दिले. व्यक्तिमत्व विकास कसा घडवावा हे राठोड यांनी आपल्या अनुभवातून सांगितले नाट्यकलेत विद्यार्थ्यांना व्यासपीठावर बोलावून विद्यार्थ्यांकडून नाटकाचे प्रयोग करून नट्या सहज आणि सोप्या पद्धतीने कसं करायचे हे अभिनय मधून करून दाखवले. प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये कला लपलेली असते त्याला बाहेर कसे काढावे हे सुद्धा विद्यार्थ्याला समजावून सांगितले.
कला प्रत्येकाला जिवंत ठेवत असते म्हणून आपण कला जोपासावी असे आवाहन केले कलाशिक्षक सुरेश राठोड यांनी सांगितले. आकांशा दुपारे, प्राची गिरी,या विद्यार्थिनींनी आम्हाला शिबिराच्या माध्यमातून खूप काही शिकता आले असे आपल्या मनोगतातून व्यक्त केले. लोकमतचे पत्रकार शरद मिरे,प्राचार्य इमरान शेख, शिक्षिका फुला भागवत यांच्या उपस्थितीत समारोपीय कार्यक्रम पार पडला शरद मिरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. राष्ट्रीय विद्यालय ही शाळा विद्यार्थ्यांची सर्वांगीण विकास करणारी शाळा आहे असे सांगून याही पुढे आपण इतर विद्यार्थ्यांची कार्यशाळा आयोजित करू असे आपल्या मनोगतामधून व्यक्त केले.
शिबिरात विद्यार्थ्यांची उपस्थिती लक्षणीय होती. संचालन, कलाशिक्षक,सुरेश राठोड यांनी केले तर आभार कीर्ती मेहरकुरे यांनी मानले. उन्हाळी प्रशिक्षण शिबिराचा सर्व आर्थिक भार शाळेतील सर्व शिक्षक वृंदानी उचलला. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी अंगद शिवरकर, अजय चांदोरे,अझहर कुरेशी,अरविंद टिकले, सलीम शेख, वंदना हुकरे, प्रणिता घुमे,शुभांगी बालपांडे,, शोएब कुरेशी, रेहान सय्यद, नाना दिघोरे, शेषराव चौधरी इत्यादींनी अथक परिश्रम केले.