सोयरीक….२
मुलगी पाहून आमची बोलेरो” सुसाट निघाली.भगवान चेअरमन जोरजोरात हसत ,हसत बोलला अशोक तुही पाचशेची नोट शाबूत ” काढली राव त्या पावण्या नि तुह्या कडून. मी” ही थोडा हसलो, आणि बोललो जाऊ दे भो! जमलं तर जमून जाईल लग्न. अस म्हणत पप्पू कड पहात त्याला विचारलं मुलगी पसंद आहे ना ? पप्पु थोडा बावरला , मला मस पसंद हाय पण त्यांनी सांगितलंय दोन तीन दिसांनी कळवतो त्या मूळ इलाज नाय पप्पू त्यावर हे उत्तर आलं .मारुती मात्र गप्प होता. अचानक तो बोलू लागला,अशोक! काय काळ बदलत चाललाय र..! आपल्या वक्ताला पोरा कडून कळवतो म्हणायचे आणि आज पोरी वाले कळवतो म्हणत्यात….!
चेरमन बोलला ही येळ आणली कोणी आपणच ना! मारुती ला काही समजेना, तो बोलला चेरमन नीट बोल. चेरमन थोडा हसला आणि माझ्या कडे पहात बोलला अशोक तूच सांग भो समजून ,तोवर गाडी ही आणखी सुसाट निघाली होती. परंतु सगळे बराच वेळ गप्प होतें. कुणीच काही बोलत नव्हतं. भगवान ने गाय छाप काढली आणि मळू लागला , मारुतीला काय राहवलं नाही तो बोलला, आर मयतीवून आल्या गत गप्प का ? आपण अस काय केलं ज्या मूळ ही येळ आली त्य” सांगा पहिल्. मी बोललो सांगतो बाबा…! नीट ध्यान देऊन एक. मारुती वंशाला दिवा हवा म्हणून किती पोरी पोटात मारल्या , मारुती मात्र आता गप्प झाला होता त्याने ही हे कृत्य केलं असल्या मुळे त्याला गप्प राहण्याशिवाय पर्याय नव्हताच.चेरमन बोलला मला तीन पोरी हाय भो ..! पण आपुन काय अस केलं नाय. मारत्या तू किती येळा पोटात पोरी मारल्या त्य” सांग की. जाऊ द्या राव पण मला अजून बी काय मेळ लागत नाय मारुती डोकं खाजवत बोलला.
मी म्हंटल आर येड्या पोटातच पोरी मारल्या त्या मूळ मुलींची संख्या कमी झाली. आन ज्याला त्याला तुझ्या सारखा वंशाला दिवा लागत असल्या मुळे अनेकांनि मुली होऊच दिल्या नाही . मग विचार कर फक्त पोर जन्माला आली पण पोरी कुठं आल्या, आता हीच पोर लग्नाला आल्यावर मुलीं कुठं हाय . बर मुलींची संख्या कमी असल्या मुळे त्यांची डिमांड वाढली ,पोरगा नोकरीलापाहिजे ,शहरात घर पाहिजे गावी जमीन पाहिजे ,बर ज्या पोरांच्या नशिबी हे सगळं होत ते झाले पिवळे ,पण ह्या पप्या सारखी किती तरी पोर अजून बिनलग्नाची तशीच आहेत ना! ह्या मूळ सामाजिक विषय ही मोठा गँभिर झालाय. जाऊ दे मारुती तुला नाही समजणार आपलं हय सोयरिकीच बघ दोन दिसांनी फोन लाव मुद्दाम ,आणी म्हण दुसर स्थळ आलंय म्हणून मग व्हय नाय सांगतील तरी. मारुती ने ही बर बर म्हणत मान डोलावली .
आता गाडी ने वडनेर ची शिव ही ओलांडली होती. काही मिनिटातच गाडी आमच्या गावातील भांडवाडी जवळ येताच भागवान बोलला अय भो मला इथं उतरवा ,माही गाडी इथं लावली. आता घरी गेल्याव मोकार श्या खावा लागत्याल गड्या अशोक ,मी हसलो म्हणलं खा की त्यानी कुड भोक पडत्यात का ? भांडवाडी वर गाडी थांबताच ,ज्यानी कोणी हे भांडवाडी नाव ठेवलं त्याला सलामी गड्या भगवान मी बोललो .भगवान बोलला कस काय रे! मारुती बोलला भगवान बाहेर आवाज येत नाही का ? भाडणाचा भगवान हसला आर म्हणून तर भांडवाडी नाव ठेवलंय ना भो. आपलं गाव कमी इचित्र हाय का सांगा बर म्हणत तो खाली उतरला.
भगवान ला सोडून गाडी थेट आमच्या घरा जवळ थांबली. म्हतारी दारात बसली होती. मी उतरलो मारुतीने गाडीतूनच आवाज दिला आत्या येतो संध्याकाळी, म्हतारी बोलली काही येऊ नको! तुह्या वाचून काही अडल नाय इथं कोणाच.. तू उलथशील संध्याकाळी फाट्याव पेताड लोकांचं काय खर हाय. अस म्हतारी बोलताच मारुती बोलला ,इथं भेटली वर तरी नको भेटू म्हणत गाडी निघून गेली. माझ्या कडे पहात म्हतारी बोलली कुड गेला व्हता र! म्हणलं गेलो होतो पप्या ला पोर बघायला . पोरी तरी किती बघतोय हा पप्या दोन तीन वर्षे झालं तस पोरच बघतोय पण लगीन काय जमाना आजून. पोरांच्या लग्नाच अवघाड हाय बघ त्यात गावात असलं तर पोर देत नाय कोणी. मी म्हणलं बरोबर बोलली तू आक्का. बर काही खाल्लं का नाय तू आता पोरीच्या घरची कोणी जेवाण बीवाण कोण करत नाय
अस आक्का बोलताच मी म्हटलं तुझा मस अभ्यास हाय गड्या ” आक्का , ती फक्त हसली .
तो दिवस कसा निघून गेला काही समजलं ही नाही.
दुसऱ्या दिवशी ज्याची भीती मारुतीला होती तेच झालं होतं.
त्याने मला फोन केला,आणि सांगितलं घे तुझा तीन तिघाड.
त्या भग्या नि साऱ्या डेरित सांगितलं पप्या ला पोर बघायला गेलो होतो म्हणून, आणि वर पोरी वाले दोन तीन दिसांनी निरोप देणार हाय अस ही सांगितलं काय गरज होती त्याला डेअरीत इशय काढायची . मी म्हंटल जाऊ दे सांगू दे कधी तरी माहीत होणारच ना!
– अशोक पवार
8369117148