श्रावणसरी
कोवळी किरणे
क्षणांतच सूर्याचे
जणू ढगामधून डोकावणे
चाफ्याच्या सुगंध
दरवळला
जास्वंद घरांची
शोभा वाढवला
निशिगंधाच्या गंधाने
मन प्रफुल्लित करुन गेला
डोंगर दर्या
मध्ये गाव माझे
त्यात उंच उंच
माडांची झाडे
नदीचे दर्याखोर्या तून
येणे जणू
माय लेकराला
भेटायला येणे
पावसांची रिमझिम
सरी
मोरांची थुई थुई नाचणे
मन आनंदित करी
हिरवी पोपटी पालवी
आली झाडाला
इंद्रधनुष्याची कमान
शोभा दिली आकाशाला
सजले माझे
अंगण सुखाने
आगमन केले
श्रावणाने
कु.श्रुती चौधरी
धाराशिव.