समता सैनिक दलाचे झाले ऐतिहासिक एकत्रीकरण
गौरव प्रकाशन चाळीसगाव (प्रतिनिधी) : दि.10 डिसेंबर 2023 रोजी चाळीसगाव येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त महाराष्ट्रातील २६ जिल्ह्यात आणि देशातील 6 राज्यात कार्यरत असणाऱ्या तीन समता सैनिक दलाच्या गटांचे एकत्रिकरण कॅप्टन अशोक खनाडे,वर्धा याचे अध्यक्षतेत तर अशोक टेंभरे, चंद्रपूर. रमेश जाधव,कोल्हापूर.धम्मा कांबळे,यवतमाळ. धर्मभूषण बागुल, चाळीसगांव.गुलाब राजे, रत्नागिरी.ऍड.अभय लोखंडे,नागपूर.राजभाऊ कदम,मुंबई. संजय ओरके, पुलगावं यांच्या प्रमुख उपस्थीतीत घोषित झाले.
देशातील वर्तमान आव्हाने आणि विश्र्वभूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या “संघटित व्हा!” या उपदेशानुसार सांगोपांग विचारविनिमय करून या तीन्हीं गटांनी स्वयंप्रेरणेने एकत्रीकरणाचा निर्णय घेतला आहे. समता सैनिक दलाच्या पुनर्रचनेचे हे एक महत्वाचे पाऊल असून एकत्रिकरणाने समता सैनिक दलाची शक्ती वाढणार आहे.ही आंबेडकरी आंदोलनासाठी सकारात्मक आणि अत्यंतआनंददायी घटना आहे. या बैठकीत राष्ट्रीय कोअर कमिटी,राष्ट्रीय कार्यकारीणी व राज्य कार्यकारिणीची सर्वानुमते घोषणा करण्यातआली.
समता सैनिक दल हे विश्व भूषण डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापित केलेले मातृसंघटन असून सर्व प्रकारची विषमता नष्ट करून”भारतराष्ट्र”निर्माण,सुरक् षा, व संवर्धन या मिशनसाठी हा एकत्रीकरणाचा संकल्प आहे. या ऐतिहासिक एकीकरणाचे संयोजन समता सैनिक दलाच्या चाळीसगाव युनिटने केले. एकत्रिकरणाला तिन्ही ग्रुपचे 96 पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.