दिलीप एडतकर यांच्यावर टीका करणाऱ्यांनी वय, संस्कार आणि राजकीय भान ठेवण्याची गरज: सदानंद नागे
गौरव प्रकाशन दर्यापूर (प्रतिनिधी) : तीवसा येथे खासदार डॉ. अनिल बोंडे यांच्यावर झालेल्या दगडफेकीवरून राजकीय घमासान सुरू असताना काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी ज्या प्रकारे आपले मत मांडले त्यांच्या मताचा अर्थ काही टीकाकारांना समजलाच नाही त्यामुळे त्यांनी टीका करताना आपले वय आपले संस्कार व आपले राजकीय बुद्धी वापरून टीका करावी असे मत सदानंद नागे अध्यक्ष धनगर समाज संघर्ष समिती दर्यापूर यांनी व्यक्त केले.
विशेषतः कोणतेही ठिकाणी काही विपरीत घडले तर त्याला गृह मंत्रालय जबाबदार असतात कारण की त्यांचं खुफिया विभाग व इतर पोलीस यंत्रणा घटनेवर किंवा कोणत्याही कार्यावर अगोदरपासूनच लक्ष ठेवून असतात म्हणून काँग्रेसचे प्रवक्ते दिलीप एडतकर यांनी ज्या प्रकारे विषय मांडला तो अगदी योग्य असून कोणत्याही पक्षाची भूमिका हा त्या पक्षाचा प्रवक्ता मांडू शकतो हे टीकाकारांना समजलेच नाही.
त्यांनी गजनी व अमरावतीचे संजय राऊत असे शब्द वापरले उलट आपण ज्या पक्षात आहात त्या पक्षाचा गृहमंत्री असल्याने आपण अगोदर आपल्या गृहमंत्र्यावरच टीका करावी कारण की ते महाराष्ट्रमध्ये राजकारणात आतापर्यंत ज्या घडामोडी होत आहेत, त्यामध्ये ते सपशेल अपयशी ठरले आहेत म्हणून अगोदर त्यांनी आपल्याकडे पहावं नंतर दुसऱ्याकडे बोट दाखवले पाहिजे. फक्त राजकीय स्वार्थासाठी काहीही बोलू नये व काही प्रतिक्रिया किंवा टीका करताना राजकीय भान ठेवावे असे सदानंद नागे यांनी टीकाकारांना म्हटले आहे.