मायावती प्रधान यांचे दुःखद निधन
गौरव प्रकाशन
अमरावती (प्रतिनिधी) : आष्टी येथील जेष्ठ साहित्यीक, कवी शिवा प्रधान, आणि,आसेगाव पूर्णा.पोलीस स्टेशनचे, माजी पी.एस. आय. सतीश प्रधान, यांच्या मातोश्री कालकथित मायावती वासुदेवराव प्रधान यांचे वयाच्या 89 व्या वर्षी दिनांक 10_11_24 ला अमरावतीला नुकतेच निधन झाले. त्यांचे पश्चात त्यांचे पती वासुदेवराव प्रधान, दोन मुले व एक मुलगी आणि नातवंड असा मोठा आप्त परिवार आहे.
त्या एक उपासिका, सामाजिक कार्याची आवड तसेच एक आयुर्वेदाच्या जाणकार म्हणून त्यांची ख्याती आसपासच्या बाराक्रोशित होती. त्यांनी आयुष्यभर हे कार्य केले, खुप रुग्ण बरे केले, त्यामूळे त्या एक लोकप्रिय माता होत्या. त्यांचे निधनाने एक मोठी पोकळी निर्माण झाली.
समाजामधे त्या एक आदर्श होत्या. त्यांना आदरांजली व पुन्यानुमोदन कार्यक्रमाच्या निमित्ताने अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद अमरावतीचे वतीने विनम्र अभिवादनमध्ये कवी पदमाकर मांडवधरे, संजय वाघूळे, प्रा.संजय धांडे, कवी नरेंद्र गुळघाने, प्रा अरविंद कुमार मनोहर,प्रा.हिरा.गवई, प्रा. अनिता धुर्वे, मधूराणी बनसोड, स्नेहल अभ्यंकर, डाॅ अनघा सोमवंशी, राजकुमार भगत, विजय जितकर, आदींनी आदरांजली वाहिली आहे.