बलिप्रतिपदा
Contents
hide
कथा पुराण सांगती
होता दानशूर राजा
डंका त्रिलोकी रे होता
नाव त्याच बळीराजा !!
बलवान भक्तिवान
लय होता प्रजा दक्ष
देव, दानव,मानव
होत सर्वांवर लक्ष !!
ऐसा शेतकरी राजा
धन धान्याचा सुकाळ
शेतकरी सुखी सारे
बळीराजा रे प्रेमळ !!
अशा बळीचा रे घात
केला बटुवामनान
तीन पावलाच दान
मांगे कपटी मनान !!
बळी भूमिहीन केला
राजा पाताळी घातला
असा शेतकरी राजा
त्याच्या हक्कास मुकला !!
बलिप्रतिपदा दिनी
देवा एकच मागणी
माझ्या बळीचा रे बळी
आता घेऊ नये कुणी !!
राज्य बळीचे येऊ दे
धन,धान्य, पीकू दे
सुख,समृद्धि,येऊ दे
आत्महत्या रे टळू दे !!
– वासुदेव महादेवराव खोपडे
सहा पोलीस उपनिरीक्षक(सेनी)
अकोला 9923488556