दापोरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५ व्या पुण्यतिथी महोत्सवास सुरुवात
Contents
hide
* ह भ प ग्रामगीताचार्य रायजीप्रभु शेलोटकर महाराज यांच्या अमृतवाणीतून ग्रामगीता प्रवचनास सुरुवात
गौरव प्रकाशन मोर्शी (तालुका प्रतिनिधी) : मोर्शी तालुक्यातील दापोरी येथे मानवतेचे महान पुजारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचा ५५ वा पुण्यतिथी महोत्सव व सर्व संत यांच्या स्मृती दिनानिमित्य संगीतमय ग्रामगीता प्रवचन ह भ प ग्रामगीताचार्य रायजीप्रभु शेलोटकर महाराज यांच्या मधुर वाणीतून मोठ्या उत्साहात संत्पन्न होत आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व वैराग्यमूर्ती संत गाडगेबाबांनी आजन्म सेवा करीत भारताच्या विश्वमानवाच्या सुख समृद्धी उद्धारासाठी अविरत परिश्रम घेतले , शुद्ध त्यागमय बंधुत्वाचा अमृतमूल्य बोध दिला, एकात्मता, विश्व बंधुत्व, विश्वशांती, अंधश्रद्धा, सामुदायिक प्रार्थना, रामधून, हि महान साधना बनवून ग्रामवासीयांना जागृत केले हे सर्वश्रुतच आहे.
आज काळाचे गरजेनुसार वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या आचार विचारांची आचरणाची अत्यंत गरज आहे, त्यामुळे दापोरी नगरीमध्ये पुण्यतिथी महोत्सवाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या पुण्यतिथी महोत्सवामध्ये सामुदायिक द्यान, प्रबोधन, स्वच्छता अभियान, रांगोळी स्पर्धा, विवीध विषयांवर व्याख्यान, सत्संग, भजन, व्यसनमुक्ती, यासह विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
३१ तारखेला दापोरी नगरी मध्ये हजारो भाविकांच्या उपस्थितीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा निघणार असून काल्याचे कीर्तन ग्रामगीताचार्य श्री रायजीप्रभु शेलोटकर यांच्या हस्ते होणार आहे. या पुण्यतिथी महोत्सवामध्ये विविध उपक्रम राबविले जाणार असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या स्मृती महोत्सवामध्ये सहभागी होण्याचे आवाहन दापोरी गुरुदेव सेवा मंडळातर्फे करण्यात आले असून पुण्यतिथी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याकरिता दापोरी येथील युवक व गावकरी मंडळी अथक परिश्रम घेत आहे.