रासेयोचा पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत सहभाग
पिंपळखुटा/स्वाती इंगळे
श्री संत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपळखुटा राष्ट्रीय सेवा योजना पथकाने शासनातर्फे राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत उस्फूर्तपणे सहभाग नोंदविला.
ही मोहीम राबविताना राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवक स्वयंसेविका यांनी पाच वर्षा आतील बाळांना पोलिओ डोज देण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदणीला या लसीकरण दरम्यान एकूण ९६ बाळांना डोज पाजण्यात आला त्यात गावातील ८४, बाहेर गावातील ९ आणि पाच वर्षावरील ३ मुलांना डोज देण्यात आला. समावेश आहे.
या मोहिमेला सरपंच दिलीप राऊत यांच्या हस्ते प्रारंभ झाला. हे अभियान राबविण्यासाठी अंगणवाडी सेविका सूर्यकांताताई धांडे, सिंधुताई जंजाळ,सुरेखाताई गाढवे ,आशा वर्कर कमला राघोर्ते जयश्री बेंदूरकर यांनी सहभाग घेतला होत. तसेच राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. नरेश इंगळे,गटप्रमुख वैष्णवी बुराडे गावंडे, वैष्णवी गावंडे सह राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक स्वयंसेविका उस्फूर्तपणे सहभागी झाले होते.