Rahul Gandhi : राहुल गांधींच्या आरक्षण आश्वासनामुळे धनगर समाजात आनंदोत्सव
प्रदेश काँग्रेस प्रवक्ता अँड.दिलीप एडतकरांनी मानले राहुलजींचे आभार
Amravati News अमरावती (प्रतिनिधी) : आमचे सरकार आले तर आरक्षणाची टक्केवारी वाढवून वाढीव आरक्षणात धनगर समाजाला आरक्षण देऊ असे ठोस आश्वासन पुणे येथील प्रचार सभेत राहुल गांधी यांनी दिले असून धनगर समाजाच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नावर ठाम भूमिका घेणाऱ्या राहुलजींचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रवक्ता अँड दिलीप एडतकर यांनी आभार मानले असून निवडणूक निकाल आल्यानंतर धनगर समाज बांधवांचे शिष्टमंडळ राहुल गांधी यांना भेटून त्यांचा सत्कार करणार असल्याचे ॲड दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे.
धनगर समाजाचा अनुसूचित जमातीचा प्रश्न गेले अनेक दशकं प्रलंबित असून धनगर समाज अनुसूचित जमातीत समाविष्ट असूनही केवळ धनगर आणि धनगड या शब्दातील शेवटचे अक्षर ‘र’ च्या ऐवजी ‘ड’ झाल्यामुळे धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी होऊ शकली नव्हती १९७१ पासून धनगर समाजाची ही मागणी समाजातर्फे रेटून धरण्यात येत असून काँग्रेसच्या राजवटीत धनगर समाजाला विमुक्त जाती , भटक्या जमाती प्रवर्गात समावेश करून आरक्षण सवलती देण्यात आल्या होत्या काँग्रेसने किमान भटक्या विमुक्तांमध्ये धनगरांचा समावेश केला होता तथापि भारतीय जनता पक्षाने आजवर कोणतेही आरक्षण दिलेले नाही. भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षणाची अंमलबजावणी करू असे २०१४ मध्ये दिलेले आश्वासन पाळले नाही आणि या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात किंवा प्रचारात कुठेही धनगर समाजाच्या आरक्षणाची अंमलबजावणी करू असा साधा शब्दही उच्चारण्यात आलेला नाही या पार्श्वभूमीवर आरक्षणाची मर्यादा ५०% वरून वाढवण्यात येईल आणि धनगरांसह इतर छोट्या जातींनाही आरक्षणाचा लाभ देण्यात येईल असे राहुल गांधी यांनी म्हटल्यामुळे धनगर समाजाच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत असे सांगून ॲड दिलीप एडतकर यांनी राहुलजींचे आभार मानले आहेत.
महाराष्ट्रात धनगर समाज मोठ्या संख्येत असून धनगर समाज आरक्षणाच्या अंमलबजावणी बाबत उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाने धनगर आणि धनगर या एकच जाती असल्याचे अमान्य करीत न्यायालयीन कक्षे पुरता धनगर आरक्षणाचा मुद्दाच संपुष्टात आणल्यानंतर आता नव्याने धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीत करण्याच्या राहुल गांधी यांच्या आश्वासनामुळे धनगर समाजाला आदिवासींसाठी राखीव असलेल्या आरक्षणा व्यतिरिक्त आदिवासींच्या आरक्षणाला धक्का न लावणारे आरक्षण मिळणार असल्याने धनगरांच्या आरक्षणाला खुद्द आरक्षित असलेले आदिवासीच मनापासून पाठिंबा देतील त्यामुळे धनगर आरक्षण आता टप्प्यात आले आहे असेही ॲड दिलीप एडतकर यांनी म्हटले आहे .महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांनी सुद्धा धनगर आरक्षणाबाबत काँग्रेसची सकारात्मक भूमिका असल्याचे म्हटले होते हे या ठिकाणी उल्लेखनीय ठरावे.(Latest News)