माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जीवनचरित्र विजयीगाथा पोवाडा व ( फिल्म) चित्रफितीचे प्रकाशन
प्रशांत वाघ
गौरव प्रकाशन कोपरगांव (प्रतिनिधी) : तालुक्यातील संवत्सर भीमवाडी येथील रहिवासी व कोपरगांव तालुका औद्योगिक वसाहतीचे संचालक प्रा. पंडीत जमनराव भारूड यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जीवनचरित्र विजयीगाथा पोवाडा चित्रफितीचे प्रकाशन माजीमंत्री, आमदार प्रा. राम शिंदे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच झाले. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे द्वितीय पुण्यस्मरण व पंच्याण्णव्या जयंतीनिमीत्त श्रीगोदावरी धामचे गुरूवर्य महंत रामगिरी महाराज यांचे संगीतमय श्रीमद भागवत कथेचे आयोजन करण्यांत आले होते त्या सांगता कार्यक्रमांत विजयीगाथा फिल्म सी डी चे प्रकाशन करण्यांत आले.
याप्रसंगी माजी आमदार सौ स्नेहलता कोल्हे, सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे, राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती रमेशगिरी महाराज, कृषी भूषण दत्तात्रय कोल्हे, माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, डॉ. मिलींदराव कोल्हे, रविंद्र काळे, उपाध्यक्ष मनेष गाडे, डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्तकर्ते, माजी जिल्हा परिषद सदस्य संपतराव भारूड यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रा. पंडीत भारूड हे संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टीटयुटचे कर्मचारी असुन त्यांनी माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांच्या जीवन कार्याचा अभ्यास करून त्यावर पंचेचाळीस मिनीटांची फिल्म चित्रफितीसह पोवाडा व त्यांचे रंगीत डिजीटल छायाचित्र तयार केले, वीजेचा प्रवाह सुरू होताच त्याच्या भोवतालचे सर्व दिवे चकाकू लागतात,व पोवाडा सुरु होतो हे दृष्य डोळयांना अतिशय नयनमनोहर वाटते.
प्रा. पंडित भारुड यांनी तयार केलेल्या माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे यांच्या जीवनचरित्र फिल्म,विजयीगाथा व पोवाडयाचे प्रकाशन माजीमंत्री, आमदार प्रा. राम शिंदे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
(छाया_ जय जय जनार्दन फोटो, कोपरगाव)