प्रज्ञावंत तपस्वी प्रा.पुरुषोत्तमदादा नागपुरे
बारा डिसेंबर तेवीस ।
दादाचे देहावसान ॥
अनुयायी – कुटुंबांचे ।
अश्रूत चिंब नयन ॥
महानुभाव पंथाचे ।
ज्येष्ठ संशोधक दादा ॥
बत्तीस ग्रंथांचे लेखक ।
कारंजेकरजी दादा ॥
महानुभाव ग्रंथाचे ।
साहित्य शिरोमणी ॥
ज्येष्ठ श्रेष्ठ साहित्यिक
अक्षर साहित्य लेखणी॥
दादांचे साहित्य विश्व ।
अनमोल योगदान ॥
साहित्याचा विषय ।
महानुभाव तत्त्वज्ञान ॥
अनमोल कादंबरी ।
कथा – वैचारिक ग्रंथ ॥
प्रकाशन प्रकाशित ।
संशोधनपर ग्रंथ ॥
सौजन्यसिंधू सज्जन ।
ज्येष्ठ पुरुषोत्तम दादा ॥
महानुभाव पंथाचे।
प्रज्ञावंत तपस्वी दादा ॥
जय श्री चक्रधरा ही ।
सुबोध जीवन गाथा ॥
स्वामींच्या चरित्राची ही।
प्रेरक जीवन कथा ॥
सूर्य उगवला-कथा ।
राष्ट्रीय पुरस्कार मान॥
प्रासादिक शब्दाला हा ।
दादा लेखनी सन्मान ॥
पुरुषोत्तम दादांना ।
करितो करांनी नमन ॥
दादांच्या पवित्र स्मृतींना ।
माझे कोटी कोटी वंदन ॥
– प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले,
रुक्मिणी नगर,अमरावती.
भ्रमणध्वनी :८०८७७४८६०९