रासेयो द्वारा वृक्षारोपण
पिंपळखुटा (प्रतिनिधी) : येथील श्रीसंत शंकर महाराज कला व वाणिज्य महाविद्यालय पिंपलखुटा राष्ट्रीय सेवा पथकाचे वतीने “एक पेड मॉ के नाम” अंतर्गत वृक्षारोपणाचा कार्यक्रम राबविण्यात आला.
सेवानिवृत्त ज्येष्ठ शिक्षक ज्ञानेश्वर डेरे यांचे हस्ते महाविद्यालय परिसरात “बेलाचे झाड” लावून वृक्षारोपण मोहिमेला प्रारंभ करण्यात आला. महाविद्यालय परिसरातील झाडाला ट्री गार्ड बसविण्यात आले.तत्पुर्वी सुध्दा गाव परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.ही वृक्ष लागवड मोहीम टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणार असल्याचे रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.नरेश शं. इंगळे यांनी सांगितले.
या मोहिमेत ज्येष्ठ शिक्षक डी.आर.डेरे,रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. नरेश शं. इंगळे, महिला कार्यक्रम अधिकारी प्रा. श्यामला वैद्य, प्रा. कार्तिक सोळंके संतोष नागपुरे,अमित मेश्राम तसेच आदित्य सेलोकार, ओम मते, देवांश कोहळे प्रतीक घोळके, हर्षल मालखेडे सह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी सहभागी झाले होते.