पेंशन अदालत व कार्यशाळा 2 व 3 नोव्हेंबर रोजी
गौरव प्रकाशन
अमरावती, (प्रतिनिधी) : नागपूर हे विदर्भातील सर्व कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकारी यांचेकडून प्राप्त पेंशनधारक व कौटुंबिक पेंशनधारकांना विविध माध्यमातून सोयी सुविधा पुरवित आहे.
पेंशन प्रकरणांवर प्रक्रिया करण्यासाठी आहरण व संवितरण अधिकारी यांना मार्गदर्शन करून पेंशनधारकांच्या तक्रारी कमी करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात आहरण व संवितरण अधिकारी व पेंशनधारकांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात येत आहे.
त्याअनुषंगाने, पेंशन अदालत व कार्यशाळा गुरूवार दि. 2 व शुक्रवार दि. 3 नोव्हेंबर, 2023 रोजी नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती येथे आयोजित करण्यात आली आहे. संबंधितांनी या कार्यशाळेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी विवेक घोडके यांनी केले आहे.