प्रमोद चौधरी करजगाव (प्रतिनिधी) : श्री संत देविदास महाराज समाधी संस्थांनचे अध्यक्ष बळीराम विश्वनाथजी हिरवे यांचे वडील स्व.विश्वनाथ उकंडरावजी हिरवे यांची आज सकाळी 08:15 ला देवाज्ञा झाली.
त्यांचा अंत्यविधी उद्या दिनांक 4 फेब्रुवारीला दुपारी 12 च्या नंतर ठेवण्यात आलेला आहे. स्वर्गीय विश्वनाथरावजी हिरवे यांनी आयुष्यभर देवाची उपासना केली. उपासनेबरोबरच त्यांनी रंजल्या गांजल्यांना, निराश्रीतांना, दुखीतांना, आयुष्यभर मदत करून त्यांच्या हाल अपेष्टा कमी करण्याचं काम त्यांनी केलं. रंजल्या गांजल्यांच्या सेवेतच रामाचा मंत्र त्यांनी जपला आणि म्हणून त्यांच्याबद्दल सबंध लोकांना नितांत आदर आहे. आज त्यांच्या जाण्याने त्यांचा परिवार तथा गावकरी मंडळी शोकाकुल झाले आहे.
संत देविदास महाराज त्यांच्या आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवाराला या दुःखातून सावरण्याची ताकद देवो अश्या शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहेत.
त्यांच्या पश्चात मुले लक्ष्मणराव, बळीराम, पांडुरंग, रामचंद्र, मुलगी, जावई, स्नुषा, नातवंडं असा आप्त परिवार आहे.