पितृपक्ष…
वडीलांचं रूप घेऊन
कावळा घरी आला
ताटातील मेनू पाहून
बोलाव वाटलं त्याला
बरं नव्हतं तेव्हा कधीच
आणली नाहीस गोळी,
आज कशाला वाढतोस रे
ताटात पुरणाची पोळी!
विनाकारण भांडत होता
दिसले खरे रूप,
कशाला वाढतो मला
आता गावरान तूप!
चटणी वर तेलासाठी
होत नव्हता राजी,
कशाला वाढतो पात्रावर
वडे आणि भजी!!
प्रेम नाही,जिव्हाळा नव्हता
नाही दिलीस साथ,
आज कशाला वाढतो रे
पात्रावर वरण भात!!
गावाकडे मला ठेऊन
केली घराची वाटणी,
कशाला वाढतो पात्रावर
आज लोणचं चटणी!!
हिस्सा वाटणीसाठी केली
बहिणी संगे दूरी,
आता काय उपयोग वाढून
पात्रावरती पुरी!!
आयुष्यभर ठेवली रे
आईबापाबद्दल अढी,
आता कोण पिणार ती
द्रोणामधली कढी!!
तुझ्यापासून वेगळं राह्यलो तेव्हा नाही
दिलास मला धिर,
आज कशाला वाढतो तू
पात्रावरती खिर!!
सणासुदीला आणलं नाही
मला नवं कापड,
आता कशाला वाढतोय
कुरडई अन् पापड़!!
आजारी असताना तू
धुतली ना सतरंजी,
आता कशाला वाढतो रे
पात्रावर करंजी!!
जिवंत असतांना पोरा
दिले असतेस लक्ष,
तृप्त झाले असते पुर्वज
नसता पितृपक्ष!!
पितरांचा मिळून तयार
होतो पितृपक्ष,
बऱ्याच घरात आज मात्र
झाला विरोधी पक्ष!!
सांगतोय तू रहा सदैव
जेष्ठांप्रती दक्ष,
करावं तसं भरावं लागेल
इतिहास देईल साक्ष!!
मातृपितृ देवोभव्
ReplyForward |