मध्यरात्री अपघातग्रस्तासाठी पंकज ठरला ‘देवदूत’
* भाजपच्या नकुल सोनटक्केंनी दिले बळ
* मित्रपरिवारासह केला सन्मान
गौरव प्रकाशन (प्रतिनिधी)
दर्यापूर : तालुक्यातील येवदा या राज्य महामार्गावर मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास चारचाकी वाहनाचा अपघात झाला. त्यामध्ये अपघात ग्रस्त व्यक्ती वेदनेने विव्हळत असताना त्या धाडसी युवकाने समय सुचकता दाखवत त्याला तातडीने उपचारासाठी मदत करत आपल्या कर्तव्य तत्परतेचा परीचय दिला. असे युवक देशाची शान असून राष्ट्रनिर्माणासाठी व युवक निर्माणासाठी त्यांना मदत केली पाहिजे. या भावनेतून भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांनी त्या युवकाला बळ दिले.
त्याचा मित्र परिवारासह सन्मान केला. पंकज ज्ञानदेव कान्हेरकर असे त्या धाडसी युवकाचे नाव आहे. पंकज हा येवदा येथील राज्य महामार्गावर असलेल्या नर्मदा कृषी केंद्रावर पहारेकरी म्हणून काम करतो. मध्यरात्री दीड वाजता पंकज कर्तव्यावर असताना अकोटकडून अमरावतीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक एम. एच.२७ बी.वी.६३७७ चा रस्त्यावर अपघात झाला. या अपघातात राजेंद्र सिंग हे वेदनेने विव्हळत असल्याचे पंकजच्या निदर्शनास आले. पंकजने त्याना तत्काळ आपल्या सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला. अपघातग्रस्ताला त्याने गाडीच्या बाहेर काढलं. तसेच शासकीय रुग्णवाहिकेशी संपर्क करून तत्काळ रुग्णवाहिका बोलवली. तसेच त्याला पुढील उपचाराकरिता रुग्णवाहिकेने अमरावतीकडे रवाना केले.
पंकजच्या या सामाजिक बांधिलकीची दखल राज्यसभेचे खासदार तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष डॉ.अनिल बोंडे, आमदार प्रकाश भारसाकडे, माजी आमदार रमेश बुंदिले, भाजपचे सरचिटणीस नितिन गुडधे, रेखाताई मावसकर, विलास कविटकर, विधानसभा प्रमुख गोपाल चंदन, तालुकाध्यक्ष मदन पाटील बायस्कार, ओमप्रकाश शर्मा, रामदास कराळे यांच्या सूचनेने भाजपच्या जिल्हा कार्यकारिणीचे सदस्य नकुल सोनटक्के यांनी पंकजचा सत्कार केला. शाल श्रीफळ देऊन त्याला सन्मानित करण्यात आले. यावेळी माजी गटशिक्षणाधिकारी संजय वाघमारे, मुख्याध्यापक त्र्यंबक सोनटक्के, प्रशांत हाडोळे, नरेंद्र मानकर, गजानन जोहरी, योगेश गुप्ता, राजेंद्र राऊत, विलास ठाकरे, डॉ.अरुण चोरे, संतोष मालवे, ज्ञानपाल राऊत, मयूर वांदे,पंकज कैकाडी, ज्ञानेश्वर मेश्राम, संतोष मुरकुटे, सागर हरसुले, पार्थ हाडोळे संकल्प शिंगणजुळे, प्रेम मुंडाले, वैभव मुंडाले, रिद्धी माने, दुर्वा ठाकूर,सर्वेश वडतकर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी पंकजच्या या धाडसाबद्दल त्याचे कौतुक केले.