पांडुरंगाच्या पालखीपदयात्रेने दुमदुमली गुरुकुंजनगरी
गौरव प्रकाशन गुरुकुंज मोझरी(प्रतिनिधी) :आषाढी एकादशी निमित्य आयोजित भव्य पालखी पदयात्रेतील टाळमृदुंगाच्या निनादाने आज गुरुकुंजनगरी दुमदुमून गेली.सर्वच भक्तांना पंढरपूरची वारी घडून येतेच असे नाही यासाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आश्रम येथे रामकृष्ण हरी मंदिराची स्थापना केली होती.याचा महिमा महाराज भजनात शब्दबद्ध करतांना म्हणतात-
पंढरपुरची वारी करण्या, लांब लांब का जाता ।
इथेच येउनि सदा बसावे, वाटतसे भगवंता ।चला चला गुरुकुंज बघाया.
आज सकाळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या महासमधी पासून दासटेकडी पर्यंत गावोगावीच्या पालख्यांनी व श्रीगुरुदेव मानवसेवा छात्रालयाच्या विद्यार्थ्यांनी पालखीपदयात्रेत सहभाग घेतला.महिलांनी फेर धरून भक्तिरसात फुगडीचा आनंद घेतला.
विठ्ठल रुक्मिणी संत नामदेव,संत तुकाराम यांचे पात्र बालगोपांलानी साकारले. रामकृष्ण हरी मंदिराचे विश्वस्तप्रमुख विलास साबळे,श्रीगुरुदेव सेवा मंडळाचे सर्वाधिकारी लक्ष्मण गमे,सरचिटणीस जनार्दन बोथे,डॉ राजाराम बोथे यांच्यासह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.गुरुदेवसेवा मंडळाच्या महिला कीर्तनकार पौर्णिमा सवाई यांच्या किर्तनाने श्रोते मंत्रमुग्ध झाले.