पंडित भारुड यांना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार प्रदान
गौरव प्रकाशन कोपरगाव (प्रतिनिधी) : तालुक्यातील संवत्सर येथील सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व पंडित जमनराव भारुड सर यांना कलावंत विचार मंच व कमान फिल्म प्रोडक्शन व कमल उद्योग समूह नाशिक यांच्या संयुक्त विद्यमानाने राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार २०२४ नुकताच नाशिक येथील सार्वजनिक वाचनालय देवघेव विभाग येथे कमल फिल्म ट्रॉफी, प्रमाणपत्र ,मेडल, सन्मान पुर्वक ग्लोबल आडगाव या चित्रपटाचे दिग्दर्शक प्रा. डॉ. अनिल कुमार साळवे स्वागताध्यक्ष सुनीलजी मोंढे सर प्रा. डॉ. दिपाली सोसे, प्रा. सोमनाथ मुठाळ ,नाट्य अभिनेता सतीश खरात आदी मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत भारुड यांना राज्यस्तरीय कालावंत पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी राज्यातील मराठी चित्रपट कलावंत, शॉर्ट फिल्म फिल्म निर्माते ,गायक, लोकसंगीतकार, शाहीर, गीतकार, कवी ,लेखक, गायक, गायिका, आदिना कलावंत पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. कोपरगाव तालुक्यातील भारुड यांनी माजी मंत्री शंकर रावजी कोल्हे यांच्या जीवन कार्यावर आधारित विजयगाथा नावाची डॉक्युमेंट्री फिल्म बनवली असून ती डॉक्युमेंटरी फिल्म ४५ मिनिटाची असून यामध्ये भारुड यांनी स्वतः गाणे पोवाडे ,आणि कोल्हे साहेबांचे चरित्र लेखन केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी शॉर्ट फिल्म गुणवत्ता तसेच मराठी चित्रपट फळा त्याचप्रमाणे मराठी गीताचे रेकॉर्डिंग केलेले आहे. त्याचप्रमाणे त्यांनी गंडेतोडे, लाव्हा,क्रांतिसूर्या, पीसीबी, आदि प्रबोधनात्मक पुस्तकाचे लेखन केलेले असून त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना अनेक राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झालेले आहे.तसेच त्यांना समाजसेवक अण्णा हजारे यांच्या हस्ते समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किर्तन चंद्रिका वैजयंती, बाळासाहेब गिरी, स्वागताध्यक्ष सुनील मोंढे सर,प्रा सुप्रिया गवळी यांनी आभार मानले.भारुड यांच्या या यशाबद्दल सहकार महर्षी शंकरराव कोल्हे साहेब साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन व मार्गदर्शक बिपिन दादा कोल्हे, संजीवनी ग्रामीण शिक्षण शिक्षण संस्थेचे चेअरमन नितीन दादा कोल्हे , कोपरगावच्या पहिल्या महिला आमदार सौ स्नेहलता बिपिन दादा कोल्हे, संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजचे कार्यकारी विश्वस्त अमित दादा कोल्हे, तसेच कोपरगाव औद्योगिक वसाहतीचे चेअरमन विवेकदादा बिपिन दादा कोल्हे, गायक सुधीर रुपवते आधी कलावंतांनी भारुड यांचे अभिनंदन केले.